निराळ्या वाटेवरचा प्रवासी मी
निराळ्या माणुसकीचा निराळ्या जातीचा मी
शून्य निबंध माझ्यावरचा लिहीत जातो मी
निबंधाच्या ओळ्या कोऱ्या सोडत जातो मी
कोऱ्या ओळीच्या कोरेपानाचा श्वास घुसमटला,
तोच कोरेपणा मी कोरून लिहीत जातो मी
कोरी अक्षरांचा कोरेपणा म्हणत जातो मी
जाण्याचा मार्ग कसाही असो, वाट मात्र मी सोडत नाही ,
वाटेवरच्या मार्गाला हि, वाट कधी मी दावत नाही,
वळण वाकडी ती वाट, सरळ मार्गाने चालत जातो,
निशाब्द्पणाने शब्दाच्या जागी, असंख्य शब्द गाडत जातो,
थकून थकले पाय माझे, तरी मन माझे चालत जाते ,
रुतून रुतल्या नाती इथल्या, काळीज ते धडे गिरवत जाते,
श्वासापासून श्वासापर्यंत इतकाच जगलो व जगणार मी
निराळ्या जगण्याचे निराळे नियम सांगतो तुम्हा
निराळ्या वाटेवरचा निराळा प्रवासी मी
Apratim aahe chandrakant 🥰🥰