तुमच्या सवयीचं तुम्हाला श्रीमंत किंवा गरीब बनवतील.

शीर्षकाचे नाव वाचून कळालेच असेल आज मी कशाबद्दल सांगणार आहे ते, श्रीमंत आणि गरीब यांच्या सवयी बद्दल तर सांगेलच त्याहून अधिक या सवयी तुन येणाऱ्या मानसिक अवस्थेबद्दल हि सांगणार आहे.
समीर आणि सुरेश दोघे मित्र एकाच शाळेत एकाच विद्यापीठातून पदवीधर झालेले. त्यात समीर हुशार, त्याने संगणकाचा कोर्स पूर्ण केला आणि चांगल्या पगाराच्या नोकरीला लागला. सुरेश मात्र फारसा हुशार नव्हता मिळेल ती नोकरी करत होता. त्यामुळे दोघांच्याही पगारामध्ये दुप्पटीचा फरक होता. समीर चा पगार सुरेश च्या पगारापेक्षा दुप्पट होता.

कामाच्या व्यापामुळे दोघांनाही भेटायला वेळ नसे. दोघांचेही चांगले चालले होते अशाच वेळी सुरेश घरी जाताना त्याला समीर दिसला. बऱ्याच दिवसांनी भेटल्याने मस्त गप्पा झाल्या. त्या गप्पात सुरेशला समीर च्या आर्थिक अडचणी बद्दल कळाले.
सुरेशच्या दुप्पट पगार असूनही समीर अडचणीत होता. आणि सुरेश कडे बँकमध्ये एफडी, मार्केट मध्ये शेअर्स, काही सोने घेऊन ठेवले होते. याच्या उलट स्थिती समीर ची होती बँकेचे कर्ज आणि उधारी.

पगारावरून तर समीर श्रीमंत आहे सुरेशपेक्षा पण सुरेश त्याच्या सवयी मुळे समीर पेक्षा श्रीमंत निघाला. आणि समीर गरीब त्याच्या सवयी मुळे.

सुरेश नेहमी त्याच्या पगारातले काही अंश बचत मध्ये टाकत असे. नंतर खर्चाचा विचार करत असे. याच्या उलट समीर आधी खर्च करत असे आणि उरलेल्या पैसे बचत करी. याच सवयीतून दोघांना त्यांच्या क्षमता कळत होत्या. यातूनच एकाच्या वाटेल सुख आणि समाधान येत होते तर दुसऱ्याच्या वाटेला कर्जाचा डोंगर.
चांगल्या पगारामुळे समीर ला कर्ज खूप लवकर मिळत असे. क्रेडिट कार्ड असल्यामुळे त्याची याला सवय झाली. जे काही घ्यायची असेल तो उधारी वर घेत आणि नंतर ते त्याच्या खात्यातून कपात होत असे. याच मुळे तो आधी खर्च करी मग बचत हि सवय जडली. याच सवयी तुन दोघांची मानसिकता तयार होत होती. सुरेशला बचत असल्याने सुरक्षित वाटत होते आणि समीर नेहमी टेन्शन मध्ये असे की हफ्ते कसे फेडू. बरेच जण असेच जगत आहेत. पैसे वाढले कि काय घेऊ याकडे च त्यांचं लक्ष जात. उलट आलेल्या पैशाचं करायचं काय? या प्रश्नच उत्तर हि खुप महत्वाचं असतं. काहीजणां कडे याच उत्तर च नसते.

येणाऱ्या पैशाचं उत्तम व्यवस्थापन करणे हीच सवय तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. शिस्त खूप महत्वाची असते. याबाबतीत जर हलगर्जी पणा केला तर त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील.येणाऱ्या पैश्याच व्यवस्थापन कसे करायचे? येणारे पैसे मग ते पगाराचे असो किंवा व्यवसायातून जे काही येईल त्याच्या किमान २० ते ३०% बचती मध्ये ठेवा. ठेवलेल्या बचतीचे दोन भाग करा एक भाग लहान मुदती साठी ३ वर्षापर्यंत आणि दुसरा भाग दीर्घ मुदती साठी. जेव्हा हि आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण लहान मुदतीत ठेवलेले पैसे चा उपयोग करू शकतो. या सवयीतुन आपण आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो.

बचत करून कोणी श्रीमंत होत नाही हे खूप ऐकलं आहे. पण बचती मधूनच बऱ्याच जणांचे संसार उभे राहिले आहेत. ती सुद्धा एक श्रीमंतीचं आहे.

By Chandrakant Ubhe

like to Reading New thing, Travel, listening music and watching movie

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *