सिंह जंगलातला सर्वात उंच प्राणी नाही, तो सर्वात वजनदार सुद्धा नाही.
आणि सर्वात चलाख सुद्धा नाही. तरी असे असूनसुद्धा सिंह जंगलचा राजा मानला जातो.
याचा अर्थ खूप सरळ आणि साधा आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चलाख होण्याची गरज नाही, ना बुद्धिमान होण्याची गरज आहे,
नाही कोणती डिग्री घेण्याची गरज आहे. सर्वज्ञानी असणं सुद्धा गरजेचं नाही. कारण सिंहाकडे सुद्धा या गोष्टी नाहीत तरी सुद्धा जंगलाचा राजा असतो.
सिंहाचा स्वभाव कसा आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याचा स्वभावच असा आहे कि त्याला सर्वांच्या सर्वच घाबरून असतात.
त्याच्या स्वभावाची प्रत्येकाला माहिती असते. बघायला गेलं तर ते एक मोठं मांजर असते. तरी संपूर्ण जग त्याला घाबरत.
उदाहरण देऊन सांगतो, जेव्हा पण सिंह आणि हत्ती समोरासमोर येतात तेव्हा त्यांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टीकोन कश्या प्रकारे असतो.
जेव्हा सिंह हत्तीला बघतो तेव्हा सिंहच्या डोक्यात एकच गोष्ट येते ती म्हणजे ,’ हे माझं खाणं आहे, मी याला खाणार.’
आणि जेव्हा हत्ती सिंहला बघतो तेव्हा त्याच्या डोक्यात येते कि, ‘ पळा, नाहीतर सिंह आपल्याला खाणार’.
वरील वाक्य परत वाचा, जेव्हा हत्ती सिंहाच्या १०पट मोठा असतो.
हत्तीचा पायाखाली जर सिंह आला तर मेलाच समजा. तरीसुद्धा हत्ती सिंहला घाबरतो. का?
मेंढ्यांच्या फौजेला जर सिंहाचे नेतृत्व असेल आणि सिंहाच्या फौजेला एका मेंढा चे नेतृत्व असेल
तर सिंह मेंढ्याच्या मदतीने त्या फौजेला हरवू शकतो ज्याचं नेतृत्व मेंढा करतो पण फौज सिंहाची आहे.
हत्ती ताकदवान आहे, वजनदार आहे, शक्तिशाली आहे, बुद्धी ने सुद्धा कमी नाही तरी सुद्धा सिंह जिंकतो.
कारण सिंहाला स्वतःचा स्वभाव माहिती असतो, स्वतःचे सामर्थ्य माहिती असते. विश्वास असतो कि मी त्याला मारणार.
हा विश्वास असला पाहिजे स्वतःवर समोर मग किती हि मोठं संकट असो
त्या संकटापेक्षाही आपलं सामर्थ्य मोठं आहे हा विस्वास असला पाहिजे.
२०११ पर्यंत one -day मध्ये कोणीही द्विशतक केले नव्हते. ते जवळजवळ अशक्य आहे असं सांगितले जायचे.
२०११ मध्ये सचिन तेंडुलकर ने द्विशतक केले आणि हा भ्रम तोडला.
त्याच belief system च्या जोरावर पुढे बऱ्याच खेळाडूंनी द्विशतक केले.
(स्वतःमध्ये विश्वास ठेवा की , तुमच्यात ते सामर्थ्य आहे. जे सिंहाकडे असते.)