CONTINGENCY FUND आणि RESERVE FUND ची आपल्याला सुद्धा गरज असते का?

CONTINGENCY FUND म्हणजे आपत्कालीन निधी आणि RESERVE FUND म्हणजे राखीव निधी .

प्रत्येक देश हा या दोन प्रकारचा निधी स्वतः जवळ बाळगत असतो आणि प्रत्येक व्यापाऱ्यांना सुद्धा या निधी बद्दल सखोल माहिती असते.

आपल्या देशा प्रमाणेच आपल्या घराला सुद्धा या दोन प्रकारच्या निधी ची गरज असते.

ती का असते?  सांगतो- त्सुनामी बद्दल तुम्हाला माहिती च असेल आपल्या देशावर ती एक आपत्कालीन नैसर्गिक आपत्ती होती .

या नैसर्गिक आपत्ती मुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपत्कालीन निधी ची आवश्यकता देशाला पडली.

आणि राखीव निधी समजा एखाद्या व्यापाऱ्याला व्यापार वाढवायचा असेल आणि त्याच्याकडे पुरेशी धनराशी नसेल तेव्हा व्यापार वाढवण्यासाठी तो या निधी चा वापर करतो.

याच प्रकारे आपल्या आयुष्यात सुद्धा एखादी MEDICAL EMERGENCY येते किंवा एखादी गोष्टी साठी पैसे अपुरे पडू शकतात तेव्हा आपल्याला सुद्धा जास्त निधी ची गरज असते. तेव्हा आपल्याला ह्या निधी कामाला येतात.

या निधी चे व्ययवस्थापन कसे करायचे किंवा सुरुवात कशी करायची?

CONTINGENCY FUND हा आपल्या पगाराच्या ४ पट असला पाहिजे. म्हणजे आपला पगार ३०K असेल तर हा निधी कमीतकमी १ लाख २० हजार असला पाहिजे. आणि RESERVE फंड जेव्हा तुमचा महिना संपतो आणि नवीन पगार खात्या मध्ये जमा होतो तेव्हा पगारा व्यतिरिक्त असलेली रक्कम आपण RESERVE फंड मध्ये जमा करू शकतो.

याचे फायदे काय?

आपण आयुष्यभर पैशाची जमवाजमव एकाच गोष्टी साठी करतो, ती म्हणजे आपला पैसा आपल्या कुटुंबाला कोणत्याही कारणासाठी कमी पडला नाही पाहिजे.

हा निधी जमा करण्यासाठी किती वेळ लागेल?

ते तुमच्या बचत करण्याच्या सवयी वर अवलंबून आहे. जर तुमचा खर्च मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमच्या पेक्षा कमी पगार असलेल्या माणसाचं हे लक्ष तुमच्या आधी पूर्ण होऊन जाईल. कारण त्याची बचत करण्याची शिस्त त्याला या गोष्टी पर्यंत लवकर पोहोचवेल.

या प्रकारचे निधी जमा च नाही केले तर नुकसान काय?

या बाबतीत तुमचा अनुभव माझ्या पेक्षा दांडगा असेल.  एखाद्या कामासाठी जेव्हा आपल्या कडे पैसे कमी पडतात तेव्हा आपण कोणते कोणते पर्यायाने पैसे उभे करतो. काही वेळा कर्ज काढून आणि बऱ्याच वेळा ओळखीच्या कडून पैसे उसने घेऊन पैसे उभे करतो.

या निधी चे उद्देश?

भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींना ताठ मानेने सामोरे जाणे. आणि पैश्या बाबत स्वतःचा स्वाभिमान जपणे.

चंद्रकांत उभे- विश्वास ठेवा!  जेव्हा पैसे कमी असतात तेव्हा आपण खर्च कधी करतो असं आपल्या मनाला वाटतं, पण जेव्हा पैसे जास्त असतात तेव्हा आपण ते जपून वापरतो. (हि पैशा बद्दल ची विरोधी मानसिकता आहे).

(खूप कमवा, कमावलेले बचत करा, बचत केले त्याचा वापर करा, आणि वापर करून जे उरले ते वाटून टाका.)

By Chandrakant Ubhe

like to Reading New thing, Travel, listening music and watching movie

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *