आणि प्रश्न पडला?
देव आहे की नाही? हा प्रश्नच नसावा,
घरात असलेलं पीठ किती दिवस पुरेल , असा प्रश्न असावा,
हे बोलताच मग प्रश्न माझ्याकडे बघून उठला,
‘ माझा मी मला ठरवणारा, तू कोण बोलणारा?’
असं बोलून प्रश्न माझ्या समोर उभा ठाकला.
मी म्हणालो , ‘अरे प्रश्ना’
तू खरा कमी खोटा जास्त,
दिसतोस छोटा मोठा रास्त,
खऱ्या रुपाला बगल देऊन खोट्यात रमशील तू,
खोटेपणात सारं जग बुडवशील तू,
तुझ्या खोटेपणाच्या धाकाने सारेच भीती धरतील,
तुला सामोरं जायचं सोडून उगाच मागे पळतील ,
खोटेपणा तू कितीही मिरव खरेपणाला तोड नाही,
उलटून टाकलीस दुनियातरी उत्तरालाही जोड नाही,
प्रश्न म्हणाला,
दुनिया मतलबी रे!, दिस रातीचा खेळ नाही,
खोट्यात झोपली सारे, सत्याला खऱ्याचा मेळ नाही,
झाकून ठेवली सत्ये त्यांनी, समोर आणायला वेळ नाही,
अंधाराली दुनिया आता, दिवाच्या वातीला तेल नाही.
मी म्हणालो, प्रश्ना !
किती खोटा वागतोस तू,
खऱ्याला बाजूला सारून ,
खोट्यात खरा भासतोस तू,
संपेल भीती जेव्हा, तुझा नकाब फाडतील लोक,
निर्भीड होऊन सगळे, क्षणात पाडतील लोक,
अभय चे वरदान ज्यांना, तेच इथे जगतील लोक,
खोट्या प्रश्नांच्या दुनियेला खरेपणाने भिडतील लोक,
खऱ्या-खोट्याच्या प्रश्नाचा, नकाब आता दुभंगला,
खोटी प्रश्ने खोटी ठरलीत, त्यांना खरेपणा आला,
सत्याचा कणा ताठ झाला, अन प्रश्न तोंडावर पडला.
बेरोजगारी- उपासमारी-भूकमारी VS महामारी (कोरोना)
नेमका आपला खरा प्रश्न कोणता? ओळखा पाहू.
खूप सुंदर… प्रश्न पडणे अन् त्यांची उकल शोधणे कधीही उपयुक्त!
Mayuri Prasad Khanvilkar Thank you.
Mast Bhau
Thank you khushal