एडविन सी. बार्नेस यांना आढळून आले की, लोक विचार करतात आणि धनवान होतात, पण हे खरं आहे का? त्यांना याची जाणीव एकाकी झाली नव्हती.
या गोष्टीची सुरवात एक ज्वलंत इच्छेने झाली ती म्हणजे, महान थॉमस एडिसन यांच्या सोबत त्यांच्या व्यवसायात भागीदार होण्याची.
त्यांना एडिसनसाठी नव्हे तर त्यांच्या सोबत काम करायचे होते. ते एडिसन ला ओळखतही नव्हते, फक्त त्यांचं नाव ऐकून होते. त्यांच्याकडे न्यू जर्सी ला जाण्यासाठी ही पैसे नव्हते.
एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी असंख्य लोकांसमोर अडचणी येतात तेव्हा बरेचसे निराश होतात, पण बार्नेस त्यातले नव्हते त्यांचा निर्णय ठाम होता. ते एका मालगाडीतून गोण्यामध्ये लपून तिकडे गेले.
ते एडिसन च्या प्रयोगशाळेत पोहोचले, आणि त्यांनी एडिसन सोबत काम करायची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांना तिकडे कोणतेही काम नाही मिळाले.पण ते हताश झाले नाही. एडिसनला जेव्हा या पहिल्या भेटी विषयी विचारलेतेव्हा त्यांनी सांगितले,
“तो माझ्यासमोर उभा होता, एका साधारण भटक्यासारखा दिसणारा, पण त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होत, असं वाटतं होतं की तो ज्या गोष्टी साठी आलाय ती गोष्ट पूर्ण करेपर्यंत तो इकडून जाणार नाही”.
बार्नसला एडिसन च्या पहिल्या मुलाखतीत त्याचे भागीदार होता आले नाही. पण त्यांना एडिसन च्या कार्यालयात काम करायची संधी मिळाली.
महिने लोटले. बार्नेसने त्याच्या जीवनाचे निश्चित ध्येय म्हणून जी इच्छा व्यक्त केली होती, ती पूर्ण होण्याची चिन्ह दिसत नव्हती. पण बार्नेस आपल्या इच्छेला तीव्र करत होते तिला खतपाणी घालत होते. त्यांनी कधीच स्वतःशी म्हंटले नाही, ” याचा काय उपयोग? यापेक्षा दुसरीकडे नोकरी परवडलीअसती”. ते ठाम होते.
जर लोकांनी त्यांचे जीवनध्येय निश्चित केले आणि ते ध्येय सर्वार्थाने झपाटून टाकणारे वेड बनून जात नाही तोपर्यंत त्या ध्येयाचा पाठपुरावा केला, तर ते आपले आयुष्य एका वेगळ्याच रीतीने जगू शकतील.
जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो ते कार्य पार पाडणे होय
जेव्हा संधी आली ती वेगळ्याच रूपात, आणि बार्नेसच्या अपेक्षापेक्षा वेगळ्याच पद्धतीने आली , संधीची हीच सवय असते, ती कधी सरळ मार्गाने नाही येत, मागच्या दाराने येणाची तिला लबाड सवय असते.
ती नेहमी दुर्दैव किंवा तात्पुरत्या अपयशाच्या छुप्या वेशात वरदान बनून येते. म्हणूनच कदाचित बरेचसे लोक तिला ओळखत नसावे.
त्यावेळी एडिसनच्या ‘एडिसन डिक्टटिंग’ मशीन कार्यालयीन उपकरणाचा शोध पूर्ण झाला होता. हे उपकरण नंतर एडीफोन नावाने ओळखले गेले. त्याचे विक्रेते या उपकरणाच्या विक्रीबद्दल फारसे उत्साही नव्हते. याचा खप होणार नाही असं त्यांना वाटत होत.
हीच ती संधी बार्नेसला दिसली, त्याला माहिती होत कि तो हे काम करू शकतो. हो हि मशीन विकू शकतो. त्याने एडिसन ला सुचविले, त्याने चलाखीने हे काम स्वतःकडे मागून घेतले.
तो त्याच्या पहिल्याच प्रयोगात इतका यशस्वी झाला कि एडिसन ने त्याच्याशि देशभर त्या मशीनचे वितरण व विक्री करण्याचा करार केला.
या कराराने त्याला खूप पैसा तर दिलाच पण त्याने अफाट अशी सिद्धी मिळवली. त्याने हे सिद्ध करून दाखवले कि, खरोखरच एखादा माणूस विचार करून श्रीमंत बनू शकतो.
बार्नेसने महान एडिसनच्या भागीदार झाल्याचा अक्षरशः विचार केला, त्याने आपण पैश्यात लोळत आहोत असा विचार केला. या विचारला मूर्तिमंत करण्याचा प्रारंभ करण्यासाठी त्याच्याजवळ काहीच नव्हते. त्याच्या जवळ फक्त इच्छाशक्ती होती. इच्छा पूर्ण होईपर्यंत तिचा पदर न सोडण्याचा निर्धार होता.
सुरवात करायला त्याच्याजवळ पैसाही नव्हता. अगदी तुटपुंजे शिक्षण, कोणताच वशिला नाही, पाठबळ नाही, पण त्याची जिद्द होती, जिंकण्याची इच्छा होती, स्वतःच्या कामावर श्रद्धा होती.
या अमूर्त बळाच्या ताकदीवर त्याने एकेकाळच्या महान संशोधकांसोबत पहिल्या क्रमकांवर राहण्याचा मान पटकावला.
‘जिद्द ,चिकाटी , मेहनत कधीच सोडू नका , प्रयत्न करत रहा जोपर्यंत जे ठरवलं आहे ते घडत नाही तोपर्यंत.