मन हे उदास पाखरू झाले,
फुलांच्या पाकळीवर न बसणारे,
मधाच्या चवाला बेचव म्हणणारे,
मन हे उदास पाखरू झाले।
सूर्याच्या प्रकाशाला नको म्हणणारे,
रात्रीच्या चांदण्याला रोखू धरणारे,
शांततेच्या वाऱ्याला बिलगून जाणारे,
मन हे उदास पाखरू झाले।
काय सांगू मित्रा।।
सगळ्यांना हवे हवेसे वाटणारे,
भरकटले तरी सरळ चालणारे,
रस्त्याच्या पावली गपचूप निजणारे,
मन।।
मन हे उदास पाखरू झाले।
कुणाची तरी वाट बघणारे,
तरी कुणाची विचारपूस न करणारे,
सगळ्यांना हर्षवणारे,
सगळ्यांची काळजी घेणारे,
मन आज उदास पाखरु झाले,।।