बेंजामिन ग्रॅहम यांचं द इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर हे पुस्तक जगप्रसिद्व आहे. त्यातील काही लेख आपल्याला गुंतवणुकी बाबत नेहमीच मार्गदर्शक ठरले आहेत.(अतुल कहाते यांनी मराठी मध्ये अनुवाद केले आहे. )
यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी माणसाकडे अलौकिक बुद्धी, व्यवसायाच्या आकलनाचं असाधारण कौशल्य किंवा आतली माहिती, असणं यातलं काहीच गरजेचं नसत.
गरज असते,ती निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी नेमकी बौद्धिक जडणघडण आणि त्या जडणघडणीला धक्का पोहोचवणाऱ्या भावनांपासून स्वतःला दूर ठेवण्याची क्षमता.
मूळ मुद्दलाची सुरक्षितता आणि त्यावर पुरेसा परतावा याची सखोल विश्लेषणानंतर हमी देणारी योजना म्हणजे गुंतवणूक. या अटींची पूर्तता न करणाऱ्या योजना म्हणजे नफेखोरी.
गुंतवणूकदारासमोर दोन प्रकारच्या अडचणी असतात, पहिली अडचण मानवी स्वभावाशी संबंधित असते. तर दुसरी अडचण त्याच्यासमोर असलेल्या स्पर्धेशी संबंधित असते.
महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कितीही तरुण असलो तरीही शेअर्समधले आपली गुंतवणूक ४० वर्षानंतर नव्हे,तर ४० मिनीटांनंतरही काढून घेण्याची वेळ अचानकपणे आपल्यावर केव्हाही येऊ शकते.
कुठल्याही पूर्वसूचनेविना नोकरी जाण ,घटस्फोट, अपंगत्व, दुर्घटना यामधल्या कशाचाही आघात आपल्यावर केव्हाही होऊ शकतो. कितीही वय असलेल्या कुणावरही हा आघात होणं शक्य असतं. म्हणूनच कुठलाही धोका नसलेल्या रोख रकमेचा पुरेसा साठा प्रत्येक माणसाकडे असलाच पाहिजे.
अंदाजपंचे काही तत्वांवर काही करण्याऐवजी शिस्तीने वागण्यावर ग्रॅहम चा भर आहे. समजा, आपण आपल्या गुंतवणुकीचा ५०% हिस्सा शेअर्स मध्ये ५०% बॉण्ड्स मध्ये गुंतवायचा ठरवलं असेल, तर दर सहा महिन्यांनी आपण आपल्या गुंतवणुकीमध्ये हेच प्रमाण आहे हा का ते तपासायचे.
जर हे प्रमाण ६०-४० झाले तर शेअर्समधले काही रक्कम बॉण्डमध्ये टाकावी जर हे प्रमाण ३५-६५ झाले तर बॉण्ड मधली काही रक्कम काढून शेअर्समध्ये टाकावी. आपल्या गुंतवणुकेचे प्रमाण ५०-५० करण्यासाठी आपण १ जानेवारी आणि १ जुलै अश्या सारख्या लक्षात राहण्याजोग्या तारखा ठरवून घ्याव्यात.
चांगल्या दर्जाचे शेअर्स रास्त किमतीला विकत घेणं आणि ते आपल्याकडे कायम ठेवणं हि गुंतवणूकदाराची मुख्य उद्दिष्ठे असतात.
डिविडेंड मधून आपल्याला मिळणाऱ्या परताव्याकडे तसच आपल्याकडे ज्यांचे शेअर्स आहेत अशा कंपन्यांच्या कामगिरीकडे लक्ष देणं हेच गुंतवणूकदाराच्या दृष्टीने हितकारक ठरत.