काही लोक त्यांच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतात. अभ्यासाने अस सिद्ध झाले आहे की, तणाव हे यामागच मुख्य कारण आहे. तणावामध्ये शरीराची झीज इतर कोणत्याही कारणापेक्षा जास्त होते.
अमेरिकन इंस्टीट्यूट ऑफ स्ट्रैस मॅनेजमेंटने शरीराच्या अध: पतनाची ही प्रक्रिया अभ्यासली आणि असा निष्कर्ष काढला की, जास्तीस जास्त शारीरिक आजारांच मूळ कारण तणावच आहे.
हिडलबर्ग यूनिवर्सिटी मधील डॉक्टरांनी यासाठी एक परीक्षण केले. एक तरुण डॉक्टरला मुलाखतीला पाठवलं आणि एक अवघड गणित सोडवायला सांगितलं. तीस मिनिटांनंतर त्यांनी त्या डॉक्टरच्या रक्ताची तपासणी केली.
एखाद्याला आजार झाल्यावर नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकार शक्ति निर्माण होते तीच प्रक्रिया त्यावेळी रक्तामध्ये घडली. पण समस्या ही आहे की, या रोगप्रतीकरक शक्ति फक्त आजारावरच हल्ला नाही करत तर चांगल्या पेशी वरतीही हल्ला करतात त्यामुळे अवेळी वृद्धत्व येते.
तणाव हा पेशीमधील टेलोमेरस या पेशीच्या रचंनेवरतीच हल्ला करतो आणि त्यामुळे पेशीच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया मंदावते आणि पेशी वयस्क होतात. या परीक्षणातून हेच सिद्ध झाल आहे की जितका जास्त तणाव असेल तितका जास्त नकारात्मक परिणाम होतो.
अश्मयुगीन लोक | प्रगतशील लोक |
जास्त वेळ शांत असायचे | कायम व्यस्त आणि सतत कोणत्या तरी समस्येसाठी सतर्कतेने वागणारे |
काही विशीष्ठ घटनामध्येच तणावात राहायचे | कायम ऑनलाइन जगणारे आणि सतत त्यांच्या फोनकडे बघत नोटिफिकेशन ची वाट बघत बसणारे |
समस्या खर्या होत्या खरच जीवन मरणाचा प्रश्न असायचा | कित्येक वेळेला फक्त फोन मधील मेसेज किंवा एखादा ईमेल सुधा समस्येची घंटी वाटतो. |
खरच समोर आलेल्या समस्येला वेळी कोर्टिसोलं आणि अड्रेंनाइलच डोस शरीराला स्वस्थ कारचा. | सततच्या आणि कमी प्रमाणात होणार्या कोर्टिसोलंच्या प्रवाहामुळे शरीराला हानिकारक आणि भयानक आजारांना आमंत्रण |
आपल्याला जी विचारांवर विचार करण्याची सवय लागली आहे तिच्यामुळे आपण एकप्रकारे चक्रव्यूहामध्ये अडकतो. या चक्रव्यूहातून बाहेर यायला शिकल पाहिजे. आपल्याला असे कितीतरी लोक माहिती असतील जे बातम्या पाहता पाहता किंवा फोनवर बोलता बोलता नाश्ता करत असतील, तुम्ही जर त्यांना विचारलं नाश्ता मध्ये कांदा होता का? तर ते उत्तरच देऊ शकत नाहीत.
तणाव जर कमी करायचा असेल तर जागरूकतेच्या अवस्थे पर्यन्त पोहोचता आले पाहिजे
(mind-fullness)
जागरूकतेच्या अवस्थे पर्यन्त पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे ध्यान. अर्थात meditation. ध्यानामुळे बाहेरील जगातून आपल्यापर्यंत पोहोचांनार्या महितीला चाळणी लावून योग्य ती माहितीच आपल्या मनात पाठवता येते. श्वसनाचा व्यायाम आणि योगा मधून साध्य केले जाते.
जर त्यामध्ये सातत्य आणि सराव असेल तर तणाव कमी करून दीर्घायुषी होता येत.