DEL CARNEGIE- HOW TO STOP WORRYING & START LIVING. ( मराठी अनुवाद )
सन १९०९ साली, मी न्यू यॉर्क मधल्या तरुणांमध्ये सर्वात जास्त दुखी तरुण होतो. माझा मोटर ट्रक विकण्याचा पोटापाण्याचा धंदा होता, पण मोटर ट्रक कशावर चालतो, हे माहिती नव्हते आणि मला ते जाणून हि घ्यायचं नव्हतं. मी माझ्या कामाचा तिरस्कार करत होतो. west ५०-६th street वरच्या एका सवंग खोलीत जिथे मी राहत होतो तिचाही मी तिरस्कार करत होतो. या खोलीत झुरळांचं साम्राज्य होतं . मला अजूनही आठवत, कि खोलीच्या भिंतीवर माझ्या गळातल्या टायचा ढीग टांगलेला असे. मला जिथं जेवण करावं लागायचं त्या हॉटेलचाही मला तिरस्कार होता.
प्रत्येक रात्री आपल्या विराण खोलीत परतताना माझ डोकं दुखतं असे आणि हि डोकेदुखी निराशा, काळजी इ विद्रोहामुळे होत असे. मी यासाठी दुखी होतो, कारण कॉलेज जीवनात जी सोनेरी स्वप्न बघितली होती ती आता दुःखामध्ये बदलली होती. हेच का जीवन होतं ? हेच का रोमांचक व महत्वाचं काम होतं ज्यासाठी मी इतका उत्साहानं सरसावलो होतो? माझ्यापुढे जीवनाचा हाच अर्थ राहणार होता का? एक कुचकामी नोकरी करणं जिची मला घृणा वाटत होती, बेचव जेवण जेवणं आणि भविष्यात काही चांगलं न घडण्याची आशा नसणं? माझी कामना होती, कि माझ्यापाशी पुस्तक वाचायला व लिहायला सवड असेल, ज्यांचं स्वप्न मी कॉलेज जीवनात बघितलं होतं.
मी जाणत होतो,कि ज्या कामाचा मला एवढा तिरस्कार वाटतो ते काम मी सोडलं तर मला सगळीकडून फायदा होईल आणि काही नुकसान होणार नाही. खूप पैसे कमावण्याचा मला ध्यास नव्हता, परंतु चांगलं जीवन जगावं अशी इच्छा होती. थोडक्यात सांगायचं तर निर्याणाचा क्षण येऊन ठेपला होता, जो बहुतांश तरुणांसमोर येऊन उभा ठाकतो. तर मी माझा निर्णय घेतला अन या निर्णयाने माझं भविष्यच बदलून गेलं. त्यामुळे माझं जीवन इतकं सुखद व समृद्ध झालं कि ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
माझा निर्णय असा होता- मी ते काम सोडून देईन ज्याचा मी तिरस्कार करत होतो आणि चार वर्ष मी टीचर्स कॉलेज मध्ये शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलं असल्याने रात्रशाळेत प्रौढांना शिकवण्याचं काम करून आपला उदर्निवाह करेन. यामुळे मला दिवसभराचा वेळ मोकळा मिळेल ज्यात पुस्तक वाचून मी माझं लेक्चर तयार करेल. कादंबरी व कहाण्या लिहू शकेल. “जिवंत राहण्यासाठी लिहिणं आणि लिहिण्यासाठी जिवंत राहणं” हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट असेल.
परंतु मी प्रौढांना कोणता विषय शिकवू शकेन? जेव्हा मी माझ्या गतजीवनाकडे वळून पाहिलं तेव्हा मला असं आढळलं, कि कॉलेज मध्ये शिकवले गेलेले विषय जीवनात प्रत्यक्षात उपयोगी पडलेले नाहीत. पण लोकांसमोर बोलण्याची कला व्यायसायात व जीवनात खूप कामी आली होती. माझ्यात लोकांशी बोलायची हिंमत आली आणि माझा आत्मविश्वास वाढीला लागू लागला. मला हेसुद्धा स्पष्टपणे दिसू लागली कि, तोच नेता बनतो जो लोकांसमोर उभं राहून आपलं म्हणणं परिणामकारक रीतीने मांडू शकतो.
( काय वाटत तुम्हाला , हातातलं काम सोडून असं काही करायचा निर्णय बरोबर होता का?)