दुधाच्या ४पट -मटणाच्या ८पट कॅल्शियम असलेली, तुरट असुनही चवीचा बादशहा, ३०० विकारांवर मात करणारी, कुपोषण थांबविणारी पोषक- शेवग्याच्या पानांची भाजी*

कुपोषण थांबविणारी पोषक- शेवग्याच्या
कुपोषण थांबविणारी पोषक- शेवग्याच्या
दुधाच्या ४पट -मटणाच्या ८पट कॅल्शियम असलेली, तुरट असुनही चवीचा बादशहा, ३०० विकारांवर मात करणारी, कुपोषण थांबविणारी पोषक- शेवग्याच्या ☘️पानांची भाजी*
१)रक्तदाब नियंत्रित करणारी, आतड्यांचे व्रण-जखमा बरी करणारी, पित्त नियंत्रित करणारी शेवग्याच्या पानांची भाजी हि सहज उपलब्ध होत असलेली रानभाजी आहे.
*२)बाळाच्या पाचवीला हि भाजी सटवाईला नैवेद्य म्हणून दाखवितात.तो नैवेद्य बाळाच्या आईला खाण्यास देतात.*
३) अंजन:- शेवग्याच्या पर्णरसात मध घालून अंजन केल्यास डोळ्यांचे सर्व विकार बरे होतात.
४) डोकेदुखी:- शेवग्याच्या पर्णरसात मिरे वाटून लावल्यास डोकेदुखी थांबते.
५) कोंडा:- शेवग्याच्या पर्णरसाने माॅलिश केल्यास केसातील कोंडा जातो.
६) पिसाळलेले जनावर चावल्यास:- शेवग्याच्या पर्णरस,मीठ,काळी मिरी, लसूण, हळद यांचे मिश्रण पोटात घेणे, तसेच जखमेवर लावणे.
७) तोंड येणे, गळ्याची सुज, वांती, खरुज :- शेवग्याच्या पर्णरस चोळणे, गुळण्या करणे, पिणे हे सर्वोत्तम! नसल्यास शेवग्याच्या पर्ण चुर्ण खाल्ली अथवा दररोजच्या भाजीत मिसळली तरी चालेल!
८) जेवल्यावर धाप लागणे,पोटात गॅस धरणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार, तोंडाची चव जाणे, कुपोषण आदि विकारांवर शेवग्याच्या पर्णरसाचे, पावडरचे पोषणमुल्य अनन्यसाधारण आहे.
९) ☘️वायुगोळा:- पोटातील वा स्नायूंचा वायुगोळ्यावर शेवग्याच्या पर्णरसात खडीसाखर मिसळून खाणे फायदेशीर ठरते.
१०) ☘️पोटातील जखमा-व्रण, शारिरीक थकवा, हाडांची कमजोरी, कृमी आदि विकारांवर शेवग्याच्या पर्ण भाजीला तोड नाही.
आयुर्वेदामध्ये 300 रोगांवर शेवग्याने उपचार केले जाऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलॅक्स भरपूर प्रमाणात आढळून येते.* शेवग्याच्या पानांची भाजी करतात. लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर करतात.
– पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळतो.
शेवग्याच्या कोवळ्या पानांच्या भाजीने आतड्यांना उत्तेजना मिळून पोट साफ होते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी भाजीचा उपयोग होतो.

By Chandrakant Ubhe

like to Reading New thing, Travel, listening music and watching movie

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *