समोर नवरा नवरीचा डोंगर दिसत होता. काल माझं आणि दादा च बोलणं झालं होत. कि आपल्याकडेच आहे रायरेश्वर आणि आता तर खात्रीच पटली. दादाला लगेच फोन केला आणि त्याला सांगितले आम्ही गडावर आलोय तुला यायला किती वेळ लागेल तो म्हणाला नाश्ता करून लगेच निघतो. तो सातारा ला होता
माझं जुनं गाव वासोळे जे या डोंगराच्या पायथ्याशी आहे. आमचं गाव मिळून अशी बरीच गावांचं पुनर्वसन सातारा तालुक्यात केलं. कृष्णा नदीवर असलेले धोम गाव जवळ धोम धरण बांधण्यात आले आहे. हे धरण १९६८ ते १९७७ मध्ये बांधले गेले आहे. हे धरण मातीचा भरीव व दगडी बांधकामाचे आहे. याची उंची ६२. १८ मीटर असून यात पाणी साठा ३८२. ३२ दशलक्ष घनमीटर आहे. यात २ मेगा वॅट वीज निर्मिती केली जाते. हे ठिकाण वाई तालुक्यात आहे. रायरेश्वर आणि केंजळगड हि जणू सीमारेषा आहे पुणे आणि सातारा जिल्हाचे.
दादासोबत बोलणं झाल्यावर आम्ही दोघे परत गडाकडे निघालो. गडावर जायला सुरवातीला दगडी पायऱ्या आहेत. त्या चढताना अर्ध्यातच दम लागतो त्या नंतर लोखंडी शिडी येते नंतर परत दगडी पायऱ्या आणि परत एकदा लोखंडी शिडी असे ४ ते ५ मिनिट अंतर कापले कि आपण वरती गडा च्या माथ्या पाशी पोहोचतो.
सुरवातीला डाव्या बाजूला एक उंच ध्वज आहे. ज्यात महाराजांची प्रतिमा आहे. त्या हवेत तो ध्वज दिमाखात फडकत होता. नंतर सरळ वाट आहे . बराच वेळ चालत गेल्यावर एक तळ लागत. गोड पाण्याचं तळ. त्यामधलं पाणी खूप थंड होतं.
नुकताच पाऊस पडून गेला होता त्यामुळे कदाचित गडावर पाणी असेल. कारण तळ काठोकाठ भरलं होत. तिकडूनच जाताना एक आजोबानी विचारलं, कोणत्या गावाचं बाळा! मी अगदी उत्साहाने म्हणालो वासोळ्याचे. त्यांनी ओळखलं खायला वासोळ्याचे आहे ते, मग वाडीच नाव विचारलं. नवघणे वाडी सांगितलं.
मला हि बर वाटलं एवढ्या लांब येऊन कोणी आपुलकीने विचारलं. तशी हि पद्धत अश्याच दुर्गम भागात दिसते.आपल्या शहराकडे कोणी विचारलं तर नको ते शंका येत राहतात. बाबाना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो, वाटेत काही गुर चरताना दिसत होती. असाच चालत चालत मग एका ठिकाणी थांबलो एक भल्यामोठ्या झाडाखाली. हि झाडे किती जुनी असतील याचा अंदाज च बांधता येत नव्हता.