मागचा आठवडा सगळ्यांनाच आठवत असेल, हवामान खात्याने १३ ते १७ तारखेपर्यंत किनारी भाग लगतच्या प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्याच्या आधी पासूनच माझं रायरेश्वर व केंजळगड ला जायचं ठरलं होतं.
पण हवामान खात्याचा इशारा आला आणि मग जायचं कि नाही असं मनात येऊ लागलं. गुरुवार पाऊस खूप होता म्हणून जाण जवळ जवळ रद्द झालं होत तरी इतर मंडळी मात्र जायची तयारी करत होती.
मी शनिवार पर्यंतची वाट बघितली तेव्हा सुट्टी पण होती. तेव्हा जर पाऊस असता तर कदाचित गेलोच नसतो. पण दिवस मोकळा निघाला आणि आमचं जाण सुद्धा ठरलं. रात्रीची बस १२. ३० वाजता गाडी घाटकोपर डेपो इथून निघाली.
अर्थात अजून कोरोना च सावट असलं तरी पूर्ण खबरदारी घेऊन आम्ही २७ जण आमच्या सहली साठी निघालो. निघायच्या आधी रायरेश्वर आणि केंजळगड ची माहिती काढली. त्यात असं कळालं कि हे दोन्ही ठिकाण माझ्या गावच्या अगदी जवळ आहेत.
मला तर खात्रीच पटत नव्हती कारण जवळ जवळ १० वर्ष तरी गावी राहिलो असेल पण तरी कधी ऐकण्यात नाही आलं. माझी मावशी म्हणायची वर चालत गेला कि येतो रायरेश्वर पण हाच तो रायरेश्वर जिकडे छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली हे नव्हतं ठाऊक.
महाराजांचा विचार आला कि असं वाटायचं कि महाराज असतील तेव्हा आपल्या गावात आले असतील का? या वाटेने गेले असतील का? बरंच कुतुहूल होत मनात. आणि ते तिकडे पोहोचल्यावर कळणार होते. सकाळी आम्ही ७ वाजता पोहोचलो.
उतरलो सगळे आणि नंतर आमच्या ग्रुप चे लीडर खमेश यांनी सगळ्यांना सूचना केल्या
सूचना-
१. गडावर कोणीही कचरा करू नये.केल्यास त्याला आर्थिक दंड बसवला जाईल.
२.गडावर कोणत्याही गोष्टीची नासधूस करू नये.
३. आपल्या पूर्वजांनी केलेल्या शौर्याचं स्मरण ठेवून त्यांनी केलेल्या कार्याचा कुठेही अपमान होणार नाही असं वर्तन असावे.
या आणि इतर सूचना झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. नंतर गड चढायला सुरवात केली. महाराजांचं स्मरण केलं हर हर महादेव च्या गर्जना केल्या आणि पुढे चालत राहिलो. बरंच अंतर चालल्यावर स्वतःची क्षमतेची जाणीव झाली.
कि याच्या पुढे चालणं जरा अवघड च जाणार आहे. माझ्या सोबत माझी पत्नी सोनाली होती त्यामुळे बोलत बोलत किती अंतर चाललो हे कळलंच नाही. गडाच्या पायथ्याशी आल्यावर जरा थोडा वेळ थांबू म्हणालो आणि थोडा वेळ गडाच्या पायथ्याशी बसलो. थोड्या गप्पा झाल्या आणि
त्या गप्पात मला समोर एक डोंगर दिसला नवरा नवरीचा डोंगर.