रायरेश्वराचे मंदिर साधं आणि कमी उंचीच होत. दगडी बांधकाम असलेलं मंदिर आणि त्यात वसलेला रायरेश्वर. रायरी चे पठार म्हणून कदाचित या गडाला रायरेश्वर नाव पडले असावं. नाहीतर कदाचित मंदिरावरून नाव आले असावे. कसेही असले तरी रायरेश्वर फार जागृत देवस्थान आहे. आणि त्याच उदाहरण आपल्या सगळ्यांना च माहिती आहे.
याच मंदिरात छत्रपतींनी वयाच्या १६ व्या वर्षी दिनांक २७ एप्रिल १६४५ मध्ये स्वराजाची शपथ घेतली. तुम्हाला काय वाटत, रायरेश्वर असाच प्रसन्न झाला असेल का? आपल्या कडे जवळ जवळ सर्वच देशात असा शपथविधी असतो न्यायालयात होतो, आपल्या शाळेत होतो, सैनिक जेव्हा भरती होतात तेव्हा होतो. किती जणांच्या शपथा खऱ्या ठरत असतील. फारच मोजक्या लोकांच्या, का? का तर घेतलेली शपथ खरी करण्याची धमक फारच थोड्या लोकांमध्ये असते. त्यातले च एक छत्रपती शिवाजी महाराज.जे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि आपल्या भारताचे प्रेरणास्थान आहे.
वयाच्या १६ व्या वर्षी घेतलेल्या शपथे साठी त्यांना आयुष्यभर झुंजावं लागलं. एवढंच काय तर जिवंतपणीच आपल्या मुलाचं श्राद्ध घातले. अफझल खानाच्या वेळेस त्यांच्या राणी मरण पावल्या तरीही त्यांना बघण्यासाठी जात आलं नाही. इतका त्याग. अफझल खान मारला गेला त्या नंतर सलग २० दिवस चढाई करून आहे त्या पेक्षा ४ पटीने स्वराज वाढवलं इतके समर्पण. शाहिस्तेखाना च्या लाख भर फौजेतूनही आपण सुखरूप सुटू हि असलेली निष्ठा. याच शपथेपाई. आणि त्याच जागी आम्ही सगळे उभे होतो.
विचारलं असत रायरेश्वराने माग तुला काय मागायचे ते? काय मागितलं असत आपण? आपण आपल्या गोष्टी मागत बसलो असतो राजांनी स्वराज मागितले म्हणून ते छत्रपती.
आणि माउली कोणाला म्हणतात हे तुम्हाला ठाऊक च आहेत कारण त्यांचं मागणंच तसं आहे.
जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे ! दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात.
आपल्याला मागता हि आलं पाहिजे, काय मागतो यावरून पण आपली पातळी समजते. रायरेश्वराला नमस्कार करून आम्ही खाली निघायचं ठरवलं. तिथेच मंदिराच्या बाजूचा फलक होता त्यात रायरेश्वर केवढा पसरलेला आहे आणि त्याच्या वर किती बाजूने कोणते किल्ले दिसतात याची माहिती होती.