1)स्वतःबद्दलची नकारात्मकता तुम्हाला कधीच तुमच्या मधले चांगले दाखवणार नाही.
जर तुम्हाला च तुमच्या मधले चांगले बघता येत नसेल तर बाहेर जगात चांगले घडते यावर विश्वास कसा बसेल?
मनातली नकारात्मकता घालवण्याची धडपड नका करू फक्त तुमच्या मनात जे सकारात्मक विचार आहेत त्यांचा विचार करत रहा.
इतका जप करा त्याचा कि आपण कधी नकारात्मक विचार करत होतो यावर विश्वास बसणार नाही. – MAJEMAN.COM
2)प्रत्येकाची खंत असते ,
मी सगळ्यांना समजून घेतो,
मलाच कोणी समजून घेत नाही,
हि खंत न संपणारी असते,
मग समोरचा समजून घेत असो किंवा नसो,
हि खंत संपवायचं बघाल तर तुमच्या मनाला वेगळीच खंत लागून राहील,
म्हणून ज्याला जे वाटतंय ते वाटू द्या.-MAJEMAN.COM
3)हरणे महत्वाचं कि जिंकणे
– ते परिस्थिती वर अवलंबून असते. जिंकून हरण्यापेक्षा हरून जिंकलेलं बरं.
महाभारताचे बघा, कौरव आधी सारिपाटच्या खेळात जिंकले आणि नंतर युद्धात हरले. याउलट पांडव सारीपाट मध्ये पांडव याना हार पत्करावी लागली. द्रौपदी चा अपमान झाला. एवढं सगळं सहन करावं लागलं. पण युद्धात त्यांनी सगळी कसब भरून काढली. अंतिम युद्ध जिंकून. -MAJEMAN.COM
4)चांगलं काम करणं हे चांगलंच आहे, पण वाईट काम न करण हे त्याहून चांगलं आहे.-MAJEMAN.COM
5)स्वतःला स्वतःचा एकटेपणा भेटला की , कोणाच्या सोबतीची गरज नाही लागत, आपण स्वतः मधेच पूर्ण असतो. तिथे रितेपणा उरतच नाही. -MAJEMAN.COM
6)डोंगर कितीही अवघड वाटू द्या, त्याची चिंता करत नाही बसायचं,
एक एक पाऊल टाकत राहायचं,
कधी माथ्यावर आलो ते कळणार हि नाही,
आयुष्य सुद्धा हेच असतं.
एकदा का कळलं कि आपल्याला हा डोंगर चढायचा आहे कि मग तो किती अवघड आहे हे विचार करत राहायचं नाही. तो पूर्ण होईपर्यंत चालत राहायचं. -MAJEMAN.COM
7)तात्पुरतं सुख कायमचं दुःख देऊन जातं. -MAJEMAN.COM