मी धावत राहिलो आई तुझ्या पाशी यायला.
वेळच नाही तुझ्याकडे बघायला.
लहान होतो म्हणाली होतीस
खूप शिक मग ये पहायला.
शिकून झालं आता, येऊ,
म्हंटलं तर, म्हणतेस नॊकरी
नको का लागायला.
नोकरी लागली आई
वेगळंच दुनियेत आलो बघ,
सकाळची रात अन रातीचा दिस
कधी होतो
वेळच नाही समजायला .
कुणासाठी नोकरी करू मी
म्हणून निघालो बघ तुझ्या कडे
परत म्हणालीस
माझं संपलं आता तू
लक्ष दे भविष्याकडे.
मी इकडे सुखात आहे गं,
या सुखाची बातच वेगळी,
पण या सुखाला किंमत काय
जिकडे तुझ्या हातची भाकरी नाय
माझे दोन हाताचे चार केलेस
म्हणतेस आता माझी गरज नाय,
पण जगातल्या महाग
जेवणाला तुझ्या हातची चव येईल काय.
अजून किती धावू आई
येतो कि तुझ्याकडे
काय करणार येऊन?
ते बघेल मी पुढच्या पुढे
नको रे नको माझ्या राजा
बोलून परत धाडतेस बघ
जगापुढे
मी धावत राहिलो आई तुझ्या पाशी यायला.
वेळच नाही तुझ्याकडे बघायला.