अफाट जगणं माझं
क्षणभर रुजवून जातो,
जगण्याचे भाव माझ्या
साठवून उराशी घे तू
ठेवून चांदणे कुशीत
हळुवार निघून मी जातो,
नसलो तुझ्या पाशी जरी मी
तुझ्यात मी रमेल,
हे दुःख अबोल हुंद्क्याचे
शिकवून तुला मी जातो,
जगणे तुलाही तेव्हा
कळले नसले जरी हि,
माझ्या पापण्या मध्ये हि
तुला घेऊन जातो,
ओल्या आसवांनी निरोप का देतेस,
भीती तुझ्या मनाची
मिटवून तुझी मी जातो.
देशासाठी जरी हि
प्राण माझा गेला,
अर्पण तुझ्यात मी हि
रुजवून अंश मी जातो.
(माझ्या सैनिक मित्रांना समर्पित – जय हिंद )
-चंद्रकांत उभे
Apratim