PART-2 HOW TO TACKLE FINANCIAL PROBLEM.
आर्थिक अडचणी सगळ्यांनाच असतात. मग तो गरीब असो कि श्रीमंत. घर चालवण्यासाठी पैसे कसे जमा करायचे हा प्रश्न गरिबांना असतो आणि व्यवसाय चालत राहण्यासाठी पैसे कसे जमा करायचे हा प्रश्न श्रीमंतांना असतो. जे आहे ती टिकवता कसे येईल हा प्रश्न मध्यमवर्गीय याना पडतो. मुळात काय तर पैश्याचा प्रश्न सगळीकडे सारखाच. पैश्याच गणित चुकल्याने टोकाची भूमिका घेणारे सुद्धा तिन हि वर्गात आहेत. गरीब घरात पैश्या ची अडचण असली तरी ते लवकर टोकाची भूमिका नाही घेत. कारण त्यांना माहिती असत अजून थोडे दिवस गरिबीत गेले तर जास्त काही फरक नाही पडत पण पहिल्या दोन वर्गाचं नसत त्यांना सामाजिक प्रतिष्ठा असते. आणि त्याच दडपण फार भयंकर असतं. तेच दडपण जेव्हा पेलेनास होत तेव्हा ते टोकाचं पाऊल उचलतात.
यावर नेमका उपाय काय? अडचणी सगळ्यांनाच असतात आणि सगळेच चांगल्या स्थितीत असतात असे नाही. काही खर्च हा करावाच लागतो त्याशिवाय पर्याय नाही. पण काही खर्च आपल्याला टाळता सुद्धा येऊ शकतो.
मागच्या भागात आपण ज्या मूलभूत गरजा पाहिल्या त्याच अनावश्यक खर्चाची सुरवात करून देतात. एक उदाहरण देतो, नुकताच नोकरी लागली आणि मग घरच्यांनी कुरकुर लावून लग्न लावून दिलं. लग्नात बाकीचा खर्च घरच्यांनी केला पण दागिन्यांचं कर्ज अंगावर आलं. ते कस बस फेडलं त्यातुन मग त्याला गाडी घ्यायची हौस झाली मग परत कर्ज अंगावर घेऊन गाडी घेतली. तीन वर्षांनी परत ते कर्ज कमी होतंय नाही होत १ BHK FLAT घेण्यासाठी उतावीळ झाला.मग पुढचं सर्व आयुष्य त्या कर्जाचे हफ्ते फेडण्यात घालवणार.
हे सरासरी आयुष्य असत माणसाचं. याच्या पलीकडे कोणाला जगण्याची इच्छा होत असेल मला नाही वाटत. कारण कोणालाही विचारा तुमची स्वप्न काय तर अशीच उत्तरे मिळणार, मला हि गाडी घ्यायची आहे, मला इकडे फ्लॅट घ्यायचा आहे ,मला लग्नात असं मिरवायचं आहे.
याना स्वप्न काय हे सुद्धा माहिती नसेल. यांच्या साठी हीच स्वप्न. मुंबई-पुणे सारख्या शहरात घर असावं ते पण स्वतःच्या कमाईतून. चांगलं च आहे. पण कधी घ्यायचं, केव्हा घ्यायचं, याचा आधी अभ्यास करावा. शाळेत केला तो गृहपाठ आणि आता आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्टी चा अभ्यास करावा लागतो. नेमका अभ्यास कश्याचा करावा आणि कसा? हे कळणं गरजेचं आहे. आपल्याला येणारी कमाई, त्यातुन भागणारा खर्च आणि त्यातून उरणारी रक्कम पुढच्या काळासाठी साठवत असतो. हे गणित साधारण सगळीकडे असते.
PART-3 HOW TO TACKLE FINANCIAL PROBLEM.