हि पिढी सकाळी उठून देव पूजा करते. देवाचं नाव घेतल्या शिवाय यांचा दिवस सुरु होत नाही. सगळं आवरून झाल्यावर बाहेर फिरायला पडतात. मग जे भेटतील त्याला हाक मारतात, विचारपूस करतात. आणि मग पुढे जातात. ओळखीच्यासोबत जुन्या आठवणींची गाणी गातात. गप्पा झाल्या की वर्तमानपत्राची खबर घेतात. आपल्यावेळेला असं काही नव्हतं हा त्यांचा आवडता डायलॉग. नंतर मग घरी येणार घरात काही काम करता येईल का ते बघतात. नातवा सोबत वेळ घालवतात.
असाच त्यांचा दिनक्रम असतो. जोडीदार असेल तर उत्तम वेळ घालवतात जर नसेल तर आपल्याच गोष्टीत रमतात. त्यांना सवय नसते पण तरी त्यांना चिंता लागून असते. दाखवत नसले तरी ते काळजी खूप करतात. कधी देवाज्ञा होईल त्यांचं त्यांना हि माहिती नसते म्हणून ती चिंता. पण चेहऱ्यावर मात्र हसू असते.
आपलं समोरच्याने ऐकलं पाहिजे, हा त्यांचा हट्ट असतो. एकवेळ चुकीचंहि असेल पण नेहमीच तस नसते हे पण खरं. काही वेळा जेवणाच्या बाबतीत त्यांची फरमाईश असते.
मान , मर्यादा, प्रतिष्ठा, जपणारे हि माणसे.मी त्याच पिढी बद्दल बोलतोय ज्या पिढीने दुष्काळ, पूर, महामारी, भूकंप, युद्ध, आणीबाणी,विकास या सर्व गोष्टी बघितल्या आहेत. या सर्व गोष्टीचा अनुभव असलेली हि माणसे आहेत.
आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्यात कुठेतरी एकटी पडत चालली आहेत. आणि नकळतपणे आपण त्यांना विसरत जातोय.
जोडीदारासमोर मन मोकळं तरी करता येत पण जिकडे नसेल तिकडे त्याचीही सोय नसते. धावणाऱ्या जगाकडे त्यांची नजर असतेच आणि या धावणाऱ्या जगाचं पुढच्या गोष्टीही माहिती असतात कारण ते सुद्धा धावत होते. ते धावत असताना ते सुद्धा विसरले असतील ज्या गोष्टी आपण आज विसरतोय.
आपण त्यांना हाक मारायची विसरतोय, त्यांची विचारपूस करायची विसरतोय. त्यांना आपल्या कडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नसते. आभाळ एका पक्ष्याकडून काय अपेक्षा ठेवणार. आपण आपल्या धुंदीत हे सुद्धा विसरतोय की आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा त्यांच्याही आयुष्यात येऊन गेला आहे. ज्या क्षणाचा आपल्याला अनुभव नाही ते क्षण ती माणसं जगली आहेत.
त्यांचा अनुभव आपल्याला शहाणा करून जातो. त्यांचे शब्द आपल्याला आज जरी कळत नसले तरी उद्या ते कळतातच. त्यांनी केलेल्या कामाची पावती आपल्याला कधीच देता येणार नाही पण आपण एक मात्र करू शकतो. त्यांचं ऐकू शकतो. त्यांच्या आठवणी, त्यांचा अनुभव, त्यांच्या चुका आणि बरच काही.
कारण त्यांना कटू सत्य कळालेलं असते. ‘मरण’. त्यांना जपा आणि त्याहून महत्वाचं त्यांचं ऐका, त्यांचं जर ऐकलं तर उद्या बाहेरच्या कोणाचं ऐकायची वेळी येणार नाही.
साधं सरळ आयुष्य मजेशीर असते, प्रेमळ मनाने केलेली चौकशी सुद्धा आपल्याला आनंद देऊन जाते.
Apratim lekh chandrakant
शेवटी जून ते सोन च असत..आणि आपण ते जपल पाहिजे.miss you माझे सर्व गोड aaji baba
Thank you so much…माझे मन.com 
व्वा भावा… खुप खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर लेख…. मार्मिक अन तितकाच मार्गदर्शक देखील…
