तीच तीच मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा अशी खुसखुशीत मेथीची वडी
साहित्य:
बारीक चिरलेली मेथी एक कप
१ वाटी कोथिंबीर
१ वाटी बेसन
अर्धी वाटी तांदळाचं पीठ
5-6हिरव्या मिरच्या
4-5लसणाच्या पाकळ्या
अर्धा इंच आल
चिंचेचा तुकडा
अर्धा टिस्पून जिर
अर्धा टिस्पून ओवा
अर्धा टिस्पून हळद
१ टिस्पून चॅट मसाला
1 टेबलस्पून सफेद तीळ
१ टिस्पून धनापावडर
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
कृती:
मेथिची पाने व कोथिंबीर धुवून बारीक़ चिरून घ्या.हिरव्या मिरच्या ,लसूण, जिर, आल्याचा तुकडा आणि चिंचेचा तुकडा टाकून मिश्रण वाटून घ्या.
एका भांड्यात चिरलेली मेथी व कोथिंबीर घेवून त्यात बेसनाचे पीठ, तांदळाचं पीठ,हिरव्या मिरचीच तयार वाटण, ओवा,सफेद तीळ, हळद, धने पूड व मीठ एकत्र करून घ्या.
आवश्यकतेनुसार पानी घालून घट्ट पीठ भिजवून घ्या.
नंतर प्रेशर कूकर मध्ये एका चाळनीवर हे पीठ पसरून उकड़ काढून घ्यावी.
कुकरला शिट्टी लावू नये साधारण १०-१५ मिनिटे उकडून घ्या.
ही उकड थंड झाली की लगेच त्याच्या वड्या कापून घ्या व छान खुसखुशीत तळुन घ्या.
तयार वडी चहा सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावी..