आयुष्याला कोणता अर्थ लावत नाही बसायचं,
आयुष्य जसं आहे तसं जगत रहायचं,
का करतोय? कश्यासाठी करतोय?
या प्रश्नांच्या मागे नाही लागायचं,
जे करतोय ते बरोबर करतोय,
असं म्हणत पुढे चालत राहायचं,
आयुष्य जसं आहे तसं जगत रहायचं,
कोणी समजून घेईल, याची वाट नाही बघायचं,
येणाऱ्या संकटात एकटे पडू, म्हणून घाबरून नाही जायचं,
कोणाच्या तरी शाबासकी साठी लाचार नाही बनायचं,
खोट्या प्रतिष्ठे साठी स्वतःला विकत नाही बसायचं,
आयुष्य जसं आहे तसं जगत रहायचं,
छोटंसं का होईना, काम करत राहायचं,
कोणी नाव ठेवेल म्हणून सोडून नाही द्यायचं,
प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी नवीन काही शिकायचं,
शिकून करू काय? असं बोलून मागे नाही फिरायचं,
जमतंय-येतंय असं बोलून धीर देत रहायचं,
हळू हळू का होईना एक पाऊल पुढे टाकत रहायचं,
उगाच मोठ्या बाता मारून, हवेत घरटं नाही बांधायचं,
आपलं आयुष्य आपलं आहे, आपल्या हिशोबाने जगायचं,
आयुष्य जसं आहे तसं जगत रहायचं,
खूप विचार करून गोंधळून नाही जायचं,
साधं-सरळ आयुष्य सोप्या मार्गाने जगायचं,
माझं-माझं करण्यापेक्षा आपलं म्हणून रहायचं,
नावारूपाला येऊन कीर्ती रुपी उरायचं,आयुष्याला कोणता अर्थ लावत नाही बसायचं,
आयुष्य जसं आहे तसं जगत रहायचं,
Khup sundar bhava.. manatal bolalas.. manasarakhch jaga.. hech aayusha aahe.. baki kai nahi..
खुप छान!