इकीगाई च्या दुसर्या पाठ मध्ये मेंदू च्या कोणत्या गुणधर्म मुळे आपले वय वाढते, तणावाचे परिणाम तसेच निरोगी आरोग्य बद्दल जाणून घेऊ
‘स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ मन’ ही प्राचीन म्हण खूप अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारी आहे. उत्साही मन तुम्हाला नेहमीच चिरतरुण ठेवत आणि वय वाढल्याची चिन्हही कमी प्रमाणात दिसतात.
एखाद्यासाठी काय करण चांगलं आहे आणि त्याला काय करावस वाटत यामध्ये कायम एक द्विधा मन: स्थिती असते. त्यामुळे तणाव निर्माण होतो. विशेषत: वयस्कर लोकांना कायम तेच करावस वाटतं जे ते आजपर्यंत करत आलेले आहेत.
खर तर चूक त्यांची नाही. कारण मेंदूची काम कराची पद्धत अशी आहे की, त्याला कोणत्याही प्रकारे बदल करण आवडत नाही आणि जे पूर्वी केल आहे त्याचप्रमाणे पुढं जाणं आणि नवा विचार नं करण आवडतं.
जेव्हा मेंदूकडे काहीतरी नविन माहिती येते तेव्हा मेंदू नविन connection निर्माण करतो आणि पुनर्जीवित होतो. म्हणूनच नेहमी काहीतरी नविन करण, बदलाला सामोरं जाणं खूप महत्वच आहे. यासाठीच, जरी थोडसं अवघड वाटलं, तणाव जाणवला तरी आपल्या comfort zone मधून बाहेर येण गरजेचं आहे.
दुसर्याबरोबर फक्त एखादा खेळ खेळल्यामुळे किंवा गप्पा गोष्टी केल्यामुळेही मनामध्ये नवचैतन्य निर्माण होत आणि एकाकीपणामुळे येणारी निरशाही नाहीशी होते.
विशीमद्धे असतानाच आपले न्युरोंन्स (मेंदूतील पेशी) वयस्क व्हायला लागतात. पण बौद्धिक व्यायाम, उत्सुकता, जिज्ञासा आणि शिकण्याची इच्छा इ. गोष्टी द्वारे या न्युरोन्सच्या वयस्क होणाच्या प्रक्रियेची गती कमी करता येते.
अशा वेळेला मानसिक व्यायाम, नविन गोष्टी जाणण्याची उत्सुकता, नवनवीन प्रसंगांना सामोरं जाणं, रोज काहीतरी नविन शिकण, खेळ खेळणं अश्या प्रकारच्या गोष्टीमुळे मानसिक व्यायाम होतो आणि साहजिकच वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते. त्याचबरोबर या कार्यामधून मिळणारा सकारात्मक दृस्थिकोण आणि उत्साह आपल्याला अनेक फायदे देतो.