भिजव रे वेड्या मनाला , थांग तुझा लागेना ,
वाट पाहतोय तुझिया येण्याची ,वेळ हि सरेना ,
भिजू दे स्वप्न माझी , तुझ्या थेंबात मावेना ,
सरू दे प्रत्येक आठवणी, ज्या काळजात दाटेना
येऊ दे तो पूर आठवणींचा , जिथे जिव्हाळा संपेना ,
कल्लोळ होऊ दे मनाचा माझ्या , तिथे आठवण रुजेना,
पाऊसा, ने रे वाहून त्या क्षणाला , जिकडे थांबणे जमेना ,
घेऊन जा त्या प्रत्येक मातीला , जिथे अंकुर फुटेना.
होतोस रुद्र तू, महाकाल कधी , करी तांडव तू ,
क्षणात पुसतो निशाणी जीवाची , अक्राळ धरी मांडव तू
वरदान तुला जगण्याचे , जीवनाचा स्पर्श तू ,
अनर्थ करू नकोस क्षणाला , जाळू नको भम्स तू.
पाऊसा,निर्दयी नको रे होऊ, जगू दे लेकरांना
तुझ्या,पालवी फुटू दे अंकुराला, जेथे वाहतील नद्या साऱ्या
पाऊस
