‘नोकरी’ हा आज एक ज्वलंत प्रश्न आहे. जागा कमी पण दावेदार असंख्य अशीच काही परिस्तिथी सगळीकडे आहे. आहे ती नोकरी टिकवणेच अवघड आहे तिकडे मोठ्या पगाराची नोकरी बघणे दुरापास्त आहे.
कंत्राट पद्धतीने सगळीकडे नोकऱ्या देणं चालू आहे. कमी पगारात काम करुन घ्यायचं आणि काम झालं कि तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं यानंतर कामावर येऊ नका, अस बोलून घरी बसवायचं अशा वेळी भरवशाची नोकरी म्हणून सरकारी नोकरीकडे पहिले जाते.
हि नोकरी मिळवण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. त्या नोकऱ्यांसाठीची जागा 400 ते 600 पर्यंत असतात आणि त्यासाठी अर्ज ३ ते ४ लाखपर्यंत येतात. म्हणजे यात पास होण्याचं प्रमाण ०. 1 % इतके आहे. सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा राज्यस्तरावर MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते. आणि राष्ट्र स्तरावर UPSC द्वारे म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते.
त्याबद्दलची माहिती www.mpsc.gov.in व www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच सरकारच्या संवैधानिक आणि स्थानिक संस्था द्वारे त्यांच्या स्तरावर परीक्षा घेतल्या जातात. IBPS ,CDS , ARMY, POLICE अश्या बऱ्याच संधी भारतात उपलब्ध आहे. पण त्या साठी करावी लागणारी मेहनत आपल्याला आपल्या क्षमता दाखवत असते.
या अश्या भरवशाच्या नोकरी नंतर विचार येतो. तो उद्योगाचा. नोकऱ्या मागण्या पेक्षा नोकऱ्या निर्माण कश्या करता येईल असा विचार करणारे बरेच कमी जण असतात. मागायची सवय सोडली कि काय देता येईल याचा विचार नक्की जमतो. प्रत्येकाने उद्योग करावा असं नाही, पण प्रत्येकाने उद्योगी असावं. जे काही मनाने ठरवलेलं असतं ते पूर्ण करण्याची धडपड प्रत्येकात असावी. मग ते पूर्ण हो अथवा न हो तो नंतर चा भाग.
प्रत्येकाला उद्योग जमतोच असं नाही, पण संधी कुठे आणि कशी तयार होईल हे सांगता येत नाही. काही आवडीच्या क्षेत्रात उद्योग करतात, काही जणांना वारसाहक्काने उद्योग पदरी पडलेला असतो, तर काही अडचणींवर मात करण्यासाठी उद्योग मध्ये पडतात, तर काहींना नाविन्याचा शोधामध्ये उद्योगाची संधी मिळते.
बेरोजगारीच्या या दुनियेत नोकरी शोधता शोधता नोकरी देता आलं तर, पण ते म्हणावं इतकं सोप्प नाही. उद्योग असाच उभा नाही राहत. त्याला परिपूर्ण अशी योजना लागते. उद्योग उभारायची योजना, उद्योग चालवायची योजना, उद्योग वाढवायची योजना आणि जर उद्योग पडत असेल तर त्यातून बाहेर येण्याची योजना. अश्या योजना तयार असतील किंवा ज्यांना या योजना माहिती असते अश्याच माणसे उद्योगी बनतात.