chandrakantubhe:
सुरवातीला जेव्हा आपल्याला एखादी नोकरी लागते किंवा business सुरू होतो तेव्हा सगळ्यांच्या मनात एक प्रकारे गोंधळ असतो की पैसे कुठे गुंतवायचे.
तेव्हा योग्य ते मार्गदर्शन न भेटल्याने कोणाच्या सांगण्यावरून एखादी policy किंवा एखाद्या fund मध्ये काही वर्षासाठी पैसे गुंतवत राहतो आणि जेव्हा आपल्याला समज येते की किती गुंतवले पाहिजे? कोठे गुंतवले पाहिजे? तेव्हा मग आपण आधीच केलेली गुंतवणुकीमुळे आपल्याला हवं तिकडे गुंतवणूक करता येत नाही.
त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करण्याच्या आधी स्वतः आपल्या योग्य वाटेल अश्या ठिकाणी गुंतवणूक करणे सोयीस्कर ठरेल.
बरेच जण equity मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात. त्यात बरेच जण कमी जास्त प्रमाणात आपल्या बचतीचे पैसे गुंतवत राहतात. काहीवेळा ते किती असावेत याचा अंदाज बऱ्याच जणांना नसतो त्यामुळे काहीवेळा त्यांच्यावर त्यांनी कमावलेली संपत्ती गमावण्याची वेळ येते.
The intelligent investor च्या पुस्तकामध्ये एका जागी सांगितले आहे की, आपली संपूर्ण saving एकाच ठिकाणी गुंतवू नका.
आपल्या बचती पैकी काही भाग हा equity मध्ये गेला पाहिजे आणि त्याच प्रमाण हे आपल्या वयानुसार असले पाहिजे.
100- 30(वय) =70
म्हणजे आपल्या बचतीच्या 70% equity मध्ये saving गेली पाहिजे.
जस जसे वय वाढत जात तसं तसे equity मध्ये saving करायचे प्रमाण कमी कमी होत जाते.
उदा
100-55= 45
म्हणजे आपल्या बचतीच्या 45% equity मध्ये आपली saving गेली पाहिजे.
*शेवटी equity हा एक risk factor आहे आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपण risk घेऊ शकतो. पण जेंव्हा आपण निवृत्तीच्या जवळ असतो तेव्हा risk घेणं धोक्याचे असते.*