इंदिरा गांधी गुढिया म्हणून संभोधली गेलेल्या भारतातील एक महत्वाचं राजकीय व्यक्तिमत्व. लालबहादूर शास्री नंतर ज्यांना पंतप्रधान पदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाल्या अश्या भारतातील पहिल्या महिला होय.
बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
त्यांचा जन्म : १९ नोव्हेंबर १९१७ मध्ये अलाहाबाद येथे झाला. एका पक्षाचे न बघता जर एक व्यक्तिमत्व म्हणून पाहायला गेलं तर इंदिरा जी भारतातील त्या काळचे कणखर नेतृत्व होते.
वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्रसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली “वानर सेना’ नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
१९५५ मध्ये त्या कॉंग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या.
केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या.
काँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी पंतप्रधान म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता.
दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेेेेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी सातव्या क्रमांकावर होत्या.[२]
इंदिरा गांधींच्या आगमनानंतर भारतीय राजकारणातील शिथिलता जाऊन त्यात गतिमानता आली होती. त्याकरिता पक्षशिस्तीची मर्यादा राष्ट्रपती गिरी यांच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना उल्लंघावी लागली. काँग्रेसची पुनर्घटना जुन्या पक्ष संघटनेचे विरोध झुगारून त्यांना करावी लागली होती.
पाक-भारत संघर्षाच्या प्रारंभी त्यांनी रशियाशी मैत्रीचा करार करून भारत- पाक संघर्षात परकीय राष्ट्रांचा हस्तक्षेप कुशलतेने टाळला. परंतु यामुळे भारताच्या अंतर्गत राजकारणावर रशियाचा प्रभाव वाढला, अशी टीका साहजिकच होऊ लागली. ही टीका अवास्तव आहे, असे इंदिराजींचे म्हणणे होत.
बांगला देशाच्या निर्मितीनंतर भारताची प्रतिष्ठा व वर्चस्व आशियाई देशांत वाढले आहे, ते इंदिराजींमुळेच, हे त्यांच्या टीकाकारांनाही मान्य होत.
अश्या या आयर्न लेडी चा आज जन्म दिवस.