लहान मुलांना नेहमी एक प्रश्न विचारला जातो, “बाळा तू मोठा होऊन कोण बनणार?” तेव्हा ती लहान पोरं पण भन्नाट असं काहीतरी बोलून जातात, मी सुपरमॅन होईल , स्पायडर मॅन होईल, हीमॅन होईल.
मुलं थोडी मोठी झाली की परत त्यांना विचारतो,” काय रे! तू मोठा होऊन कोण बनणार?” मग त्यांची उत्तरे येतात डॉक्टर होईल, इंजिनेर होईल, कलेक्टर होईल, पोलीस होईल, नेता होईल.
आणि मग काय होत? मग सुरु होते शर्यत, पळायची शर्यत. जिकडे मुलांच्या ऐवजी त्यांच्या पालकांची हौस जास्त असते. आमच्या मुलांना डॉक्टर बनवायचं आहे, मग एवढं तर केलच पाहिजे. मुलांना कुठे काय कळत? किती कष्ट करावे लागतात ते आम्हाला विचारा.
मग पालक त्या शर्यतीमध्ये धावतात जी त्यांची शर्यत नसते. कोणती शर्यत माहिती आहे. आपल्या मुलाचंपुढे काय होणार? भविष्याची चिंता हा एक मानसिक आजार आहे.
तुम्हाला खोटं वाटेल कदाचित पण हे खरं आहे. भविष्याचा विचार निश्चितच करा, पण जागरूकतेने करा, योजना बनवा, तयारी करा, पण काळजी करू नका.
प्रत्येक पालकांना एक नम्र विनंती आहे कि, मुलांना फार काही देता आलं नाही तरी चालेल. पण त्यांना त्यांचं स्वातंत्र्य द्या. इथला प्रत्येक जण हा स्वयंभू आहे त्याला बाहेर च्या मदतीची गरज नाही. फक्त त्याची जी धडपड आहे ती त्याच्या नजरेने बघा.
आज एक गोष्ट वाचू
लहान असताना बऱ्याच मुलांना आजूबाजूच्या गोष्टीच कुतुहूल असतं, एका लहान मुलाला सुद्धा होती, त्याला एक बस दिसली, त्याने कुतुहुलाने विचारलं, ” आई हि बस कोणाची? आई ने सांगितलं हि सरकारची, दुसऱ्या दिवशी आकाशात त्याला विमान दिसलं, त्याने परत आईला विचारलं, “आई हे इमान कोणाचं हाय?” आई म्हणाली,”सरकारची”.
तेव्हा त्या लहान बाळाला वाटलं हे सरकार कोणीतरी मोठं असलं पाहिजे. शाळेत एकदा गुरुजींनी सगळ्यांना प्रश्न विचारला ,”मोठा होऊन कोण बनणार?” सर्वानी आपापली उत्तरे दिली,
जेव्हा याचा नंबर आला तर पठ्याने उत्तर काय दिले असेल, “मला सरकार व्हायचं आहे.” सगळे उत्तर ऐकून हसत राहिले. याला काही कळेनाच,
तेव्हाच याने ठरवलं आता कोणी कितीही हसो , मी सरकार होईलच. जसा हळू हळू मोठा होत गेला तेव्हा त्याला सरकार म्हणजे काय हे कळालं.
आणि आपण काय सरकार होऊ शकत नाही हे उमगलं. पण त्याने जिद्द नाही सोडली , सरकार होता येत नाही म्हणून काय झालं, सरकार चा भाग तर नक्कीच बानू शकतो.
पाचवीला होता , शाळेला वर्ग नव्हते, गावात नीट शाळाही नव्हती. गावाच्या श्रम दानाने गावात शाळा बांधली त्यात यानेही श्रमदान केले.
दहावी पास झाला , केंद्रात २रा आला. मग नंतर चा प्रश्न उभा राहिला, तेव्हा त्याच्या वडलांनी त्याला सांगितलं बोर्डिंग मध्ये जा, तेव्हा ३ पोती गहू द्यायची आणि राहायचं अशी सोय होती.
११ वीला science मध्ये ऍडमिशन घेतलं, १२ वीला ८५% मार्क मिळाले. ८ जिल्हयांचं मिळून एक मेडिकल कॉलेज होत तिकडे अर्ज केला, पण प्रवेश भेटला नाही.
मग त्याने पूर्ण लक्ष शेतीवर केलं. शेती करत राहिले. लहान असतानाच त्यांना शेतकऱ्याचे हाल माहिती होते, बघितले होते. त्यांनी रोजगार हमीवर काम करायचं ठरवलं.
८ दिवसाची मजुरी करून त्यांना १५ रुपये मिळाले. आयुष्याची पहिली कमाई होती.
कष्टाची त्यांनी कधीच लाज बाळगली नाही. ट्रॅक्टर चालवणे, कपाशीला फवारणी देणे , झाड लावणे, शेती करणे हेच चाललं होत. पण एक दिवस त्यांचे आणि वडिलांचं भयंकर भांडण झालं. त्यांनी वडलांना सांगितलं आज पासून एक रुपया नाही घेणार तुमच्या कडून. असं बोलून ते निघाले,
आई ने दिलेले ३००रुपये होते त्यांच्या कडे पण आता करायचं काय? हा मोठा प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी ठरवलं की . मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन नाही भेटले मग आपलं जे शिक्षण अर्धवट राहील आहे ते पूर्ण करायचं. नशिबाने त्यांना एक जाहिरात दिसली उस्मानिया विद्यापीठाची एक वर्षात B.A. ची पदवी मिळावा.
त्यानी तेथे अर्ज करून एका वर्षात बी.ए. चा अभ्यासक्रम पूर्ण करून बी.ए. ची परीक्षा पास झाले. त्या काळात त्यांनी खूप वाचन केलं. वाचायची सवय लागली होती.
आता पदवी तर मिळाली पुढे काय? तेव्हा त्यांना त्यांचं स्वप्न आठवलं जे शाळेत असताना वर्गात सांगितलेलं.“मला सरकार व्हायचं आहे.” त्यांनी स्पर्धापरीक्षा द्यायचं ठरवलं.
आणि पहिलीच psi ची परीक्षा पास झाले, महाराष्ट्रामध्ये १३ व्या क्रमांकावर आले. ते तिकडेच थांबले असते तर तिथेच राहिले असते, त्यांनी नंतर CDS (COMBINE DEFENCE SERVICES) ची परीक्षा दिली आणि १९८३ च्या परीक्षेमधून भारतातून लेखींमधून २रे आलें.
नंतर त्यांना कळलं की , डायरेक्ट dysp ची सुद्धा परीक्षा देता येते. त्यांनी जिकडून मिळेल तिकडून पुस्तके घेतली ,
मित्राकडून , ग्रामपंचायती मधून मासिके घेतली. आणि अभ्यास सुरु केला. कोणताही क्लास नाही कि कोणाचं मार्गदर्शन नाही.
स्वतःवरचा प्रचंड आत्मविश्वास आणि जिद्द या जोरावर त्यांनी mpsc ची परीक्षा दिली. मुलाखतीमधून १५० गन मिळवून महाराष्ट्र मध्ये दुसरे आले आणि dysp झाले.
IPS प्रताप दिघावकर यांची हि गोष्ट,
आज हि ते प्रत्येकासाठी सांगतात, “तरुणांनो तुमच्यातला राग हा चांगल्या कामासाठी घालावा, त्याला चांगली दिशा द्या. एक अशक्य ध्येय ठेवा, ज्याला ऐकून सगळ्यांना हसू येईल, हसू द्या .
लहान असताना जर माझ्या वर्गातले हसले नसते तर कदाचित माझ्या मनातील रागाने एवढं घडवलच नसतं . आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी करू देऊ नका.
पालकांनाही विनंती आहे, प्रत्येकाला मेंदू आहे प्रत्येकाला त्याचे स्वप्न पूर्ण करायचं बळ हि आहे. त्याच्यासाठी कमवून ठेवून त्याला पांगळा नका करू. प्रयत्न करणाऱ्यासाठी एकच सांगेल “
तू न रुकेगा कभी , तू न मुडेगा कभी कर शपथ, कर शपथ, अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ.