ही एक जपानी संकल्पना आहे. याचा अर्थ – ‘सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद’
जपान मधील ओकिनावा सारख्या शहरातील लोकांचं आयुर्मान हे खूपच जास्त आहे. तेथील दर 1 लाख रहिवाश्यापैकी 24.55% लोक हे 100 पेक्षा जास्त वयोगटातील आहेत. हे प्रमाण जागतिक वयोमानाच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे.
सकस अन्न, साधी राहणी, ग्रीन टी(काढा), चांगलं हवामान यामुळे इकडची लोक दीर्घायुषी आहेत.
दुसर्या महायुद्धाच्या वेळी याच निसर्गरम्य ठिकाणी हल्ला झाला होता ज्यामधे 200 निरपराध लोकांचा बळी गेला होता. पण अस होऊनही तिथल्या लोकांमध्ये कोणा विषयीच द्वेष नव्हता. उलट, ते त्यांची विचारधारा आणि ‘ईचारिबो चोडे’ या तत्वानुसार सर्वांशी वागत होते.
‘ईचारिबो चोडे’ याचा अर्थ असा की, सर्वांना आपल्या भावसारख माना. तुम्ही त्यांना यापूर्वी कधीही भेटला नसाल तरीही ते भाऊ च आहेत अस माना.
प्रतेकच्या अंतरंगमध्ये इकिगाई दडलेला असतोच आणि त्याला शोधण्यासाठी संयमाची गरज असते. गावातील लोकांच्या मते सकाळी उठण्याच कारण असते, त्यांना मिळालेला त्यांचा इकिगाई.
शोधकार्याच्या आधारे काही आश्चर्यकारक तथ्य समोर आली आहेत.
हे लोक फक्त जास्त वर्ष जगतात एवढाच नाही तर यांना कधी कॅन्सर आणि हृदयरोग सारखे मोठे आजार होत नाहीत
या लोकांची जीवनशैली इतकी प्रभावी आणि आनंददायी आहे, इतर देशातील लोकांना याची कल्पना होणार नाही.
रक्तातील ज्या घटकामुळे वय वाढण्याची प्रक्रिया होते त्याच प्रमाण या लोकांमध्ये कमी असते. याच श्रेय 80% पोट भरेपर्यंत जेवण करणे आणि चहा घेणे (काढा) या त्यांच्या खाद्यसंस्कृतीला जात.
स्मृतिभ्रशां सारखे आजार जगाच्या तुलनेमध्ये नगण्यच असतात
महिलांमध्ये होणार्या रजोनिवृतीच्या काळामध्ये शरीर त्यांना अतिशय चांगली साथ देत, इतकच नाही तर जागतिक सर्वसाधारण प्रमाणापेक्षा इथल्या स्त्री-पुरूषांचे लैंगिक संप्रेरके खूप जास्त वयापर्यंत सक्रिय असतात.