एकूण पदे – प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या ३५१७ जागा
पद – प्रोबेशनरी ऑफिसर (व्यवस्थापन प्रशिक्षण)
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या सामाईक भरती प्रक्रियेत समावेश असलेल्या देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५१७ जागा.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २० वर्ष व कमाल ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७५/- रुपये आणि इतर मागास प्रवर्ग/ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.