रितेपणच आपल्या मनाच्या रिकामेपणाचं कारण असते, तस वाटू न देणे हेच समृद्धीचे पहिले पाऊल होय.
हि गोष्ट आपण अनेकांनी ऐकली असेल बघितली असेल.
एका सिग्नल जवळ पेपर वाला मुलगा सायकल घेऊन असलेल्या माणसाकडे बघत असतो त्याला वाटत असतं,
कि आपल्या कडे सायकल असती तर बरं झालं असतं.
सायकल वर असलेला माणूस शेजारी उभा असलेल्या दुचाकी माणसाकडे बघून तसाच विचार करत असतो.
दुचाकी वरचा माणूस चारचाकी गाडी कडे बघून विचार करत राहतो. इतक्यात सिग्नल सुटतो.
गाड्या निघतात आणि मग चार चाकी असलेला चालत विरुद्ध दिशेने येणाऱ्या महागड्या गाडी कडे बघून तसाच विचार करतो.
सगळ्यांचे विचार सारखेच सगळ्यांना एकच रिकामेपण भासत असते. हि गोष्ट आपल्या कडे नाही.
मग जी नाही ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जे आहे त्याकडे दुर्लक्ष करतो.
एक उदाहरण देतो, दोन कुटुंब असतात, साने आणि माने , दोन्ही घरात ३ मुले असतात आणि
दोन्ही कुटुंबामध्ये ३-३ एकर जमीन असते.
मुले मोठी होतात आता घराची जबाबदारी त्यांच्या वर येते.
साने कुटुंब आपल्या मुलांना एकत्र राहण्याचा सल्ला देतात.
तर माने कुटुंब तिघांनाही आपली आपली प्रगती करण्यासाठी शहरात जाऊन नोकरी धंदा करण्यास सांगतात.
त्यामुळे दोन्ही कुटुंबातली मुले दिलेल्या सल्ल्या नुसार राहतात.
साने कुटुंबातील मुले विचार करतात कि आपल्याकडे ३ एकर जमीन आहे.
त्यात अजून काही करता येईल का ते बघू. माने कुटुंबातील ३ एकराचे ३ भाग होऊन प्रत्येकाला १ एकर जाते.
आणि जसे गावात बऱ्याच जणांनी जमिनीला चांगला भाव आल्यामुळे जमीन विकून बंगले बांधलेले असतात,
अगदी तसेच बंगले यांनाही बांधवसे वाटतात.
लहानपणा पासून त्यांना असं वाटत राहत कि आपणही अश्याच बंगल्यात राहावं.
आणि तिघांनाही शहरात नोकरी लागते मग जमिन करणार कोण हा विचार करून ते जमिन विकतात.
आणि त्या पैश्यामधून प्रत्येक जण स्वतःसाठी बंगला बांधतो.
चांगल्या नोकऱ्या असल्याने निवृत्त होईपर्यंत शहरात असतात नंतर मग गावी येऊन त्या बंगल्यात मस्त पैकी राहतात.
जस त्यांना लहानपणी वाटत होत तसं.
फरक एवढाच की त्यांच्या कडे निवृत्तीनंतर मिळालेले पैसे आणि बांधलेला बंगला एवढीच संपत्ती उरली होती.
कारण त्यांना वाटलेले रिकामेपण ते त्या बंगल्यामध्ये शोधत होते.
प्रत्येकाला वाटत राहत आपल्याकडे हे असल्यावर आपण सुखी होऊ.
ते आल्यावर जास्त आनंद होईल. म्हणून बरेच जण आपल्याकडे जे नाही ते कसं मिळवता येईल हे बघत राहतो.
हि पण प्रगतीच आहे.
पण साने कुटुंबामध्ये काही वेगळंच घडलं,
घरच्यांनी एकत्र राहण्याचा सल्ला दिलेला होता म्हणून त्यांनी एकत्र राहायचं ठरवलं,
पण सगळेच जण जर जमिनीच्या उत्त्पनावर जगत राहिले तर किती कमावणार,
हा विचार करून शेती सोबत अजून काही करता येईल का ते बघत राहिले.
शेती म्हणालं तर २४ तास त्याची राखण करावी लागते.
म्हणून एकजण पूर्णवेळ शेती करणार असे ठरलं हि जबाबदारी मोठ्या भावाने घेतली.
मधल्या भावाने डेअरी चा व्ययसाय सुरु करण्याचा विचार केला त्याला सोबत म्हणून छोट्या भावाने सुद्धा त्याला सोबत दिली.
हळू हळू शेतीत आणि व्यवसायात जम बसू लागल्याने लहान भावाने मंडई मध्ये भाजीपालाचा व्यवसाय चालू करायचं विचारलं.
हाताखाली माणसे ठेवून तिघेही जण आपली आपली कामे बघत होती.
आणि त्यांना निवृत्त होण्यासाठी कधी वेळच मिळाला नाही. कारण ते तेच करत होते जे त्यांना आवडत होतं.
त्यांनाही लहान पणी बंगल्यात रहावस वाटत होत म्हणून त्यांनी आपल्याकडे जे आहे त्यात भर टाकायचा विचार केला.
जे आहे ते वाटून कमी करण्यापेक्षा त्यात अजून भर कशी पडेल याचा विचार करत राहिले.
साने आणि माने दोन्ही कुटुंबातली मुले मोठी होऊन निवृत्त सुद्धा झालीत.
माने कुटुंब आता रिटायर्ड आयुष्य मजेत जगत आहेत.
त्यांच्याकडे निवृत्तीनंतर चे पैसे आणि बंगला आहे. पण साने कुटुंब मात्र निवृत्ती घेत नाहीत.
ते रोज तेच काम करत आहेत जे आता पर्यंत करत आले आहेत.
दोन कुटुंबातील फरक एवढाच कि,
माने कुटुंब सकाळी पेपर वाचताना देशाची किती दुरावस्था झाली आहे यावर चर्चा करतात.
आणि साने कुटुंब रोजगार उत्पन्न करून, राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन झालेली दुरावस्था दूर करू पाहतात.
मनात आलेल्या रितेपणाला दोन्ही कुटुंबामधील मुलांनी आपल्या आपल्या परीने मोकळी वाट करून दिली.
जे आपल्याकडे नाही ते मिळवणं हे प्रगतशीलच आहे पण जे आहे ते दुर्लक्ष करून नाही.
रितेपणच आपल्या मनाच्या रिकामेपणाचं कारण असते, तस वाटू न देणे हेच समृद्धीचे पहिले पाऊल होय.
Chan sundar gost aahe…shiknya sarkh aahe…