शाळा शिकून काय करणार? तर नोकरी!
ऑगस्ट महिन्यातल्या सरकारी नोकरीची संधी.- https://majeman.com/category/opportunity/
शाळेत कधीच हा प्रश्न नाही पडला की पुढे काय करायचं? शाळा शिकून झाल्यानंतर काय करायचं?
शाळा झाली मग कॉलेज मध्ये प्रवेश केला. कॉलेज च वातावरण सगळ्यांनाच ठाऊक. तिकडेही हा प्रश्न कधी पडला नाही. पण पदवी नंतर हा प्रश्न रोज समोर यायचा. आता करायचं काय?
Resume बनवला आणि गेलो प्रत्येक कंपनी मध्ये जिथे vacancy असेल तिकडे जाऊन मुलाखत देऊ लागलो. तेव्हाही समजलं नाही की नोकरी का करायची ते ?
आपल्याला आवडीची क्षेत्र असतात, त्या आवडीच्या क्षेत्रातूनही पैसे येतात कमावता. पण तशी मानसिकताच नाही आपल्याकडे.एकच गोष्ट झाली ना पदवी घेऊन आता फिरा नोकरी शोधायला.
नोकरी च्या भानगडीत पडण्या पेक्षा प्रत्येकाने तरी स्वतःच्या आवडीचा विचार करावा, आपल्याला जे आवडतं त्यातून उत्त्पन्न काही येऊ शकत का? जर येत असेल ना तर नोकरीच्या क्षेत्रात येऊ नका. ते तुमचं क्षेत्र नाही.
हा जर नसेलच काही असं आणि परिस्थिती बिकट आहे तर जे काम भेटेल ते करायला लाजू नका.
पण बऱ्याच तरुणाची कुचंबना होते, त्यांना त्यांची आवड आणि नोकरी यात निवड करण अवघड जातं.
यातलं कारण म्हणजे त्यांनी घेतलेलं उच्च शिक्षण. बरेच जण आहेत ज्यांना वेगळं काही करावंसं वाटतं,
पण मी एवढं शिकलोय आणि असं काम केलं तर बरं दिसणार नाही.
अशी स्वतःची समजूत काढून ते त्या गोष्टीला मनात ठेवून नोकरीचा रस्ता धरतात. आणि मग कोणी भेटलं कि त्याला आपल्या मनातलं सांगतात “मला हि वाटायचं रे ते करावं! पण ते बरोबर नाही दिसणार म्हणून नाही केलं.
त्यांच्या घरच्यांनाही तेच वाटत राहतं . एवढा कश्याला शिकवला मग !
नोकरी कोणी करावी? जे specialization असतात म्हणजे त्यांनी खास नोकरी साठीच शिक्षण घेतलं असेल ते किंवा ज्यांच्याकडे दुसरा पर्याय नसेल त्यांनी हा मार्ग निवडलेला बरा.
मी बरेच जण बघितलेले आहेत, ज्यांनी शिक्षण घेतलं एक आणि करतात एक.
उत्तर उदाहरण थ्री इडियट मधलेच घ्या, पेशाने इंजिनेर असेलला बँक मध्ये नोकरी करत होता.
आपल्या इकडे थ्री इडियट मध्ये असलेला फरहान कुरेशी भरपूर आहेत. ज्यांना करायचं असते एक आणि करतात एक.
या lockdown मध्ये बऱ्याच जणांच्या नोकरीवर कुऱ्हाडी पडल्या आहेत. बरेच जण उत्पन्नाचे वेगवेगळे सोत्र शोधत आहेत, अश्या वेळेस ज्याला आपली आवड जपता आली तर त्याने ती जपावी. त्यातून काही उत्पन्न होईल का ते पहावं. ज्यांना नोकऱ्या तयार करता येईल तेवढ्या नोकऱ्या तयार कराव्या.
ज्या समाजात १०० पैकी ३० जणांना लाखभर पगार असेल आणि उरलेले बेरोजगार असतील अश्या समाजापेक्षा ज्या समाजात १०० पैकी ७० जण रोजगार असेल आणि भले त्यांना लाखभर पगार नसूदे आणि उरलेले आपली आवड जपत असतील असा समाज उत्तम.
रोजगार शोधण्या पेक्षा रोजगार तयार करता आलं पाहिजे.
ऑगस्ट महिन्यातल्या सरकारी नोकरीची संधी.- https://majeman.com/category/opportunity/
मनातील बोललात 👍👍 Worth sharing