छोटीसी स्वप्न होती,
हळुच मनात साठलेली
रिझवण्याच्या वयात
डोळ्यसमोर तरंगलेली
घेऊन संगे त्यांना
स्वार होणार होतो
इतक्यात फटका बसतो
स्वप्न धुळीत बसली
शोधू लागलो त्यांना
वेळ बोलू लागला
विसर आता स्वप्न
घे ओझं खांद्याला
शब्द नाही निघाला
डोळे तेवढे बोलले
पाणी तरल जरासं
शब्द सगळे निखळले
होती जबाबदारी म्हणून
गप्प मी हि झालो
धुळीत त्या स्वप्नांना
निरोप देऊन आलो
पाहिलं-शिकलो-जिंकलो
जे करता येईल केले
परत स्वप्नांच्या
आठवणीत मज नेले
आता वेळ कोणाची
वेळेला पाहून म्हणालो
वेळ हि कबूल झाले
जग जेत्याचे जग सारे
हळूच मग स्वप्नांनी
चाहूल मज दिली
टाप मारून घोड्याला
दौडत वारी निघाली.
छोटीशी स्वप्न खुप काही शिकवुन गेली !
Thank you Rohini
स्वप्न…… सुंदर रचना….. 👌👌👌👌👌👌