निश्चयाच्या बळा समोर ती माती समान झाली
सांजवलेल्या सायंकाळी मन माझे सांजवले
उज्जवल भविष्याच्या विचाराने मन माझे भारावले
माझ्या मनाची दशा लुकलुकणार्या काजव्या सारखी झाली
झगमगता प्रकाश घेण्यासाठी आख्खी रात्र निघून गेली
प्रयत्नाच्या कुरुक्षेत्रावर लढाया झाल्या अनेक
निश्चय व तडजोड यातले जिंकले फक्त एक
तडजोडीची सहनशीलता अचाट अफाट होती
‘पण ‘निश्चयच्या बळासमोर माती समान झाली .