आपल्या मनातलं दुःख आपणच आपल्या शब्दात लपवायच असतं. भावनांचा बांध जरी फुटला तरी स्वतःला पाण्या प्रमाणे वाहू द्यायचं नाही. मन खूप चंचल आहे. वळेल तस वळत. वाटेल तस वागत.
त्याला दुःखाच्या खोल दरीत उडी मारावीशी वाटते. गडद अंधारात मोठ्याने ओरडावस वाटतं. म्हणून वेळेत मनाला आवर घालायला शिका.
जुन्या कटू आठवणी मध्ये मन आपल्याला अंधारात घेऊन जात, त्यामुळे पुढचा प्रकाश दिसणं च कधी काळी अशक्य होऊन बसत आणि याच गोष्टीला बरेच जण खरं मानून नैराश्याच जीवन जगतात.
अश्या जगण्यातून बाहेर येणं सुद्धा कठीण होऊन बसतं जर वेळेत स्वतःला सावरलं नाही तर. त्याच जगण्याची सवय झाली की नवीन पद्धत पचनी नाही पडत. कारण आपल्या मेंदूला त्याच गोष्टी करायची सवय आहे नवीन गोष्टी त्याला नको असतात. (याच कारण खाली लिंक मध्ये दिली आहे.)
आपणच आपल्या भावनांना खरं मानून एक वेगळंच जग तयार करतो ज्यात आपण स्वतःला कमी लेखतो, आपल्या दुःखाला कुरवाळत बसतो , रडत राहतो, पण त्याच दुःखाला लाथ मारून उठून नवीन बाहेरच्या जगाला तोंड द्यायची हिम्मत नाही दाखवत.
कारण तस करायला थोडी हिम्मत लागते, ती नाही येत. नाही जमणार अस बोलत आहे तेच करत राहणारे बरेच आहेत.
नको! हे माझ्याकडून नाही होणार, हे आपलं ठरलेलं असतं. यातून बाहेर पडण्याचे दोनच मार्ग आहेत.
एक म्हणजे नविन काही शिकायला स्वतःला तयार करा, त्यात इतका वेळ घालवा की रडत बसायला तुमच्या वेळ कमी पडला पाहिजे. त्या आठवणी ची आठवण सुद्धा झाली नाही पाहिजे इतके स्वतःला व्यस्त ठेवा.
आणि दुसरा पर्याय त्या आठवणींचा कंटाळा येत नाही तोपर्यंत त्यांना कुरवाळीत बसा. एका गोष्टी साठी रडणार तरी किती? कंटाळून आपणच त्या आठवणी सोडून देऊ. अगदी वीट येईस्तोवर आठवत रहा. यात तुमचं एकच नुकसान आहे ते म्हणजे गेलेला वेळ पुन्हा परत नाही येणार. यात किती वेळ जाईल हेच नाही सांगता येत.
काहीजण लवकर नैराश्यातून बाहेर पडतात, पण काहीजणांना त्याची गोडीच लागते, ते बाहेरच नाही पडत. एकवेळ स्वतःच दुःखाला कुठेतरी मंदिराच्या पायरीवर ठेवून देवा आता तूच याला सांभाळ करत मनावर च ओझं हलके करून येतात.
आठवणींची पण एक गम्मत काही वेळेनंतर कळते त्या वयाची ती किमया असते म्हणून जे आहे ते जगत पुढे जायचं असत, तिकडेच जर अडकून पडलात तर पुढचं जगणं कसं जगाल? म्हणून रडत कुडत नाही बसायचं, चलती का नाम जिंदगी बोलत मस्त जगत राहायचं.
मेंदूला नविन गोष्ट का नको असतात