एक बिझनेस हिल स्टेशन..
माझं नाव सूर्यकांत.. मी एक यशस्वी बिझनेसमन आहे. आणि मी एका बिझनेस हिल स्टेशन वर राहतो.. हो.. बरोबर ऐकलंत बिझनेस हिल स्टेशन…
मी १५ वर्ष आधी मुंबईला राहत होतो .. मी एका IT कंपनी मध्ये कामाला होतो .. जेमतेम पगार होता .. घर भाड्याचं होत .. पगारावरच घर आणि गावच घर चालत होतं .. मला एक जुळा भाऊ पण आहे . तो एका चांगल्या कंपनी मध्ये अकाउंटंट होता .. त्याच बिझनेस मध्ये खूप बारीक लक्ष असल्यामुळे .. कंपनी चा मालक त्याच्यावर खूप खुश असायचा .. इतक की चक्क त्याने त्याला जावई करून घेतला .. त्याच्या बायकोच नाव सोनाली असं होत .. त्यांच्या फॅमिली बिझनेसेस मध्ये भावाला जॉईन केलं .. काही वर्षात ८२ करोडच्या बिझनेस ला त्याने ८२० करोड मध्ये केलं .. भावाचा यश बघून आम्ही सगळे खुश होतो .. पण आम्ही त्याच परिस्थितीत होतो .. हालाकीच्या …
भावाने फिरायचा प्लॅन केला.. त्याने मला आणि आमच्या छोटा भाऊ अजय याला आमंत्रण दिल … मी खुश होतो कारण खूप वर्षांनी त्याला भेटणार होतो ..
लहान भावाने पब्लिक बुक कंपनी ओपन केल्यामुळे त्याला जमणार नव्हतं .. आणि माझंही काहीच चांगलं नव्हतं .. त्याने दिलेल्या ठिकाणी जायचे पैसे हि नव्हते .. तरी सुद्धा भेटण्याच्या इच्छेमुळे
.. मी पैसे जमवले.. आणि निघायची तयारी केली .. वाटेत एक हिल स्टेशन वर आम्ही भेटणार होतो आणि तिकडून विमानाने प्रवास करणार होतो .. सुरेखा म्हणजे माझी बायको तिला हे काही आवडलं नाही .. कारण तिला परिस्तिथी माहित होती .. हा प्रवास खूप खर्चिक असल्यामुळे ती माझ्या इच्छेसाठी तयार झाली होती ..
आम्ही ट्रेन ने त्या हिल स्टेशन वर पोहोचलो .. तिकडून एअरपोर्ट ला जाण्यासाठी गाडी केली .. आणि आम्ही एका ठिकाणी अडकलो .. ट्रॅफिक जाम असल्यामुळे आम्हाला उशीर होत होता .. खूप काही केलं आणि आम्ही मार्ग काढला तिकडून निघाल्यावर मधेच गाडी बंद पडली .. आणि पुढे जायचं कस हा प्रश्न पडला .. सकाळचे दुपार झाली पण काहीच मार्ग नाही सापडला.. शेवटी विमानतळ चालत जायचं ठरलं .. स्वराज माझा मुलगा ४ वर्षाचा होता तो इतका चालणार नाही म्हणून आम्ही त्याला आमच्या खांद्यावर घेऊन जायला निघालो … विमानतळ १५ किमी लांब होत ..
मी भावाला फोने करायचा प्रयत्न केला पण नो नेटवर्क मुळे ते शक्य नाही झालं .. विमानतळावर पोहोचायला रात्रीचे ९ वाजले .. चालून चालून खूप भूक लागली होती .. थोडेच पैसे उरले असल्यामुळे जास्त खर्च नाही केला आम्ही .. मला नेटवर्क मिळताच मी भावाला विडिओ कॉल केला .. आणि तो जिथे जाणार होतो विमानातून त्या ठिकाणावर पोहोचला होता .. आणि मला तो म्हंटलं किती उशीर करतोय ये लवकर मी इथे पोहोचलो आणि वाट बघतोय .. असं बोलून त्याने फोने ठेऊन दिला ..
माझी इतकी वाईट परिस्थिती झाली होती कि मला काही बोलता नाही आलं .. आणि त्याने फोने ठेऊन दिला … न काही कळतां .. त्याला काहीच कस वाटलं नाही साधी चौकशी पण केली नाही .. मी कुठे आहे कसा आहे कसा येईल .. पैसे आहेत का नाही ..हे काहीच नाही .. इतकी कशी पैशाची मस्ती आली !!!
माझी नाही निदान सुरेखाचा आणि स्वराज बद्दल तरी विचारपूस करावी .. !.. का फोन ठेऊन दिला ..
असंख्य प्रश्न समोर होते माझ्या समोर कारण खिशात फक्त २०० रुपये उरले होते .. आणि मुंबईला जायला तेवढे पुरणार नव्हते .. मी हताश होऊन एका बागेच्या कट्ट्यावर बसलो होतो .. त्या बागेला लागून एक झरना वाहत होता .. आणि मी कट्ट्यावर बसून ढसा ढसा रडत होतो .. माझी अवस्था बघून सुरेख हि रडू लागली.. पण स्वराज साठी ती त्याला घेऊन बागेत गेली ..
३दिवस आम्ही त्याच परिस्थिती होतो .. त्या बागेच्या मालकाने आम्हला बघितलं आणि आमची चौकशी केली .. मी माझी सगळी हकीकत सांगितली ..त्याने माझ्या समोर दोन मार्ग ठेवले .. एक मला मुंबईचे तिकीट काढून देणार होता .. दुसरा .. त्याला त्याची बाग आणि छोटा हॉटेल चालवायला माणूस हवा होता .. मला मुंबईचा राग आधीच आला होता .. एवढं स्वतःला झिझवून मला दिल काय .. भाड्याची खोली.. आणि कर्ज .. बाकी काय नाही .. म्हणून ठरवलं आता इथंच राहायचं ..
ते हिल स्टेशन छोटासा होत .. त्यात असं बघण्यासारखा काहीच नव्हतं .. पण एक मात्र तिथे चांगलं होत .. तिथे शेती चांगली होती .. आणि मोठ-मोठे बंगले पण होते . पण रिकामे .. कारण सुट्टीतच त्यांचे मालक यायचे.. मी सगळं हिल स्टेशन बघून घेतल.. आणि त्या हॉटेल मध्ये थोडे थोडे बदल केले .. झरना जवळ असल्यामुळे बागेला शोभा येत होती .. त्याच फायदा घेऊन .. बागेतच मिनी स्टॉल टाकला .. जेणे करून तिकडून ऑर्डर मिळेल … आणि मग हळू हळू हॉटेल मोठं करायला सुरवात केली .. मी त्या हॉटेल चा मॅनेजर झालो .. आणि मग पुन्हा काहीतरी करावं म्हणून मालकांना सांगून तिकडे हॉटेल रूमसाठी छोटी जागा घेऊन टेन्ट उभे केले .. सुंदर बाग आणि झरना आणि रात्र असं अप्रतिम सौंदर्यात राहण्यासाठी पब्लिक बघायला गर्दीच करत होती ..
माझात बिझनेसच्या किडा अजून काही शांत नव्हता .. मी तिकडे एक कॅसिनो ओपन केला .. कारण तिकडे गर्भ श्रीमंतांची कमी नव्हती .. हेच हेरून मी तो कॅसिनो चालू केला .. खूप चालला इतका नफा मिळत होता कि मला त्या मालकाने प्रत्येक जागेत ५०% भागीदारी दिली … मी माझ आयुष्य खूप उंचावर नेलं …
पण …
एक दिवस एक लेटर आलं .. एका श्रीमंत माणसाला ती जागा विकत घायची होती .. त्याने आम्हाला १५० करोड ची ऑफर केली .. मला काहीही करून ती जागा विकायची नव्हती .. माझ्या नकारामुळे .. डील कॅन्सल झाली .. याचा राग धरून मालकाने आम्हला बाहेरचा रास्ता दाखवला … पार्टनरशिप पण संपवली .. हातात परत २०० रुपये …
पण मी हार मानली नव्हती .. मला बिझनेस माईंड कळलं होत.. आता कुठे हि जाईल तर बिझनेसच करेल असच ठरवलं होत .. मी त्याच हॉटेल समोर माझी वडापावची गाडी उभी केली आणि सुरवात केली .. खूप दिवसानंतर त्या जागेच्या बाजूला एक खूप मोठी इमारत उभी राहिली .. आणि त्यात खूप मोठा कॅसिनो उभा केला ..त्यात हॉटेल च्या रूम आणि एक विदेशी बार सुद्धा सुरु केला .. त्या दिवसापासून मालकाचे फक्त नुकसानच होत होते .. काही केल्या त्याचा बिझनेस चालत नव्हता .. शेवटी त्याला माझी आठवण आलीच .. तो माज्याकडे आला ..मी माझ्या कामात असताना त्याने हाक मारली .. आणि विचारलं बायको आणि मुलगा कुठे आहे .. .. ! मला एका क्षणात त्या विमानतळावर उभा असेलेल्या भावाची आठवण झाली.. खरं तर हे त्याने विचारलं पाहिजे होत .. ! विचारातून बाहेर पडलो आणि त्यांना मी माझ्या पत्र्याच्या घरात घेऊन गेलो .. सुरेखा स्वयंपाक करत होती आणि स्वराज खेळात होता .. आमची परिस्थिती बघून रडू आलं त्याला … आणि त्याने मला त्याच्या घरी यायला हट्ट धरला ..
कारण ….
तो पूर्ण थकला होता .. मूळ-बाळ कोणीच नव्हते त्याला .. बस माझाच काही त्याला आधार वाटू लागला .. शेवटच्या दिवशी त्याने मला त्याच्या रूम मध्ये बोलून घेतले.. आणि त्याच्या वकील समोर त्याने.. त्याचे सगळे इस्टेट माझ्या नावे केली … पण मी स्वाभिमानी होतो .. मी त्याच्या कुटुंबाचा शोध घ्यायचं ठरवलं.. पण हाती काहीच लागलं नाही .. आणि बिझनेस मध्ये लॉस होत होताच .. तो कसा आटोक्यात आणायचं तोही विचार सुरु होताच .. खूप दिवस विचार करून मला एक युक्ती सुचली…
मी त्या कॅसिनो च्या मालकाला भेटायचं प्रयत्न केला .. पण भेट काही झाली नाही .. शेवटी त्यांच्या PA शी भेट घालून मी त्यांना पार्टनरशिप साठी विचार केला ..यासाठी मला १७० करोड ची किंमत जमा करायला सांगिलती ..
पुन्हा प्रश्न …एवढे पैसे आणायचे कुठून .. मग आठवलं .. कोणी मागे एका श्रीमंताने हि बाग विकत घायचा ठरलं होत .. मी त्यांचा शोध घायचा ठरवलं होता .. आणि त्या माणसाला भेटून डील १७० करोड ची केली .. आणि मी कॅसिनो मध्ये ५०% चा पार्टनरशिप केली .. मला माझ्या बागेचा सारखा विचार पडत होता .. कारण ती माझ्या डोळ्यासमोर सतत दिसायची ..
६ महिने झाले.. ती बाग पडून होती .. तिची देखरेख पण नाही केली .. मला थोडी चीड आली त्या मालकाची .. पण मग पुन्हा डोक्यात बिझनेस किडा वळवळ करायला लागला .. मी त्या मालकाकडे गेलो आणि ती बाग पुढील १० वर्षासाठी भाड्याने विकत घेतली .. कॅसिनो आणि माझी बाग असा माझा बिझनेस प्लान पुढिल १० वर्ष सुरु होणार होता .. आता मी एका श्रीमंतांच्या शर्यतीत उतरलो होतो ..
मी असा एक श्रीमंत होतो … ज्याला तिथला श्रीमंत हि हाक मारत होता आणि गरीब हि .. मला सगळे दादासाहेब म्हणू लागले … दादा या साठी कि मी मोठ्या भावासारखा त्यांचे प्रश्न आपले समजून सोडवत होतो .. आणि साहेब या साठी कि एक असा माणूस जो कुठल्याही परिस्थितीत समाज्याचे प्रश्न सोडवायला उभा असतो.. मी त्या हिल स्टेशन वर असलेल्या सगळ्यां श्रीमंतांना जमा करून महिन्यातून एकदा मीटिंग घेऊ लागलो .. आणि त्या हिल स्टेशन चा कसा विकास करायचा यावर मार्गदर्शन करू लागलो .. पाहता पाहता .. हिल स्टेशन श्रीमंतांच्या यादीत अव्वल यायला लागलं..
एका मोठ्या बिझनेस मॅगझीन ने एक बातमी छापली आणि त्यात.. हिल स्टेशन वर सगळ्यात श्रीमंत असलेल्या व्यक्तींची १० नावे छापली… कुतूहलाने मी ती नावे खालून वाचल्या सुरवात केली .. आणि माझं नाव हे दुसऱ्या क्रमांकावर होत ..
पहिला क्रमांक ….
कोण असेल तो ??? मला १५ वर्षाआधी त्या हिल स्टेशन वर सोडून जाणार माझा भाऊ होता .. त्या दिवशी त्याने हि नावे वाचली आणि मला शोधायला त्या हिल स्टेशन वर आला .. मला त्या बागेत वेड्यासारखा शोधू लागला.. सुरेखा आणि स्वराजशी भेटला .. आणि ढसा ढसा तो हि रडू लागला.. मी ज्या कट्ट्यावर बसून रडत होतो.. आज मला तिथे तो रडताना दिसत होता .. मी त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणालो .. काय साहेब काय हरवलं का?…
आम्ही सगळे एकत्र आलो .. मी घरच्यांना त्या हिल स्टेशन वर बोलून घेतलं .. आम्ही तिथेच जागा घेऊन मोठा बांगला बांधला..आणि मग मला हि हळू हळू कळू लागलं.. माझ्या भावाने कॅसिनो बांधून माज्यापेक्षा हि चांगला बिझनेस केला होता … पण आमचं शेंडेफळ काही कमी नव्हतं .. म्हणजे आमचा छोटा भाऊ अजय .. त्याची प्रेस कंपनी चांगली चालली.. त्यानेच हिल स्टेशन ची लिस्ट पब्लिश केली होती … भले आम्ही दोघांनी घरच्यांना विसरून स्वतःला मोठं केलं.. पण त्याने घरच्यांसोबत राहून स्वतःला मोठं केलं..
आणि माझ्या जीवनावर पुस्तक लिहला त्याच नाव ठेवलं.. “एक बिझनेस हिल स्टेशन.. ” .. ते त्या इयर च बेस्ट सेलिन्ग बुक यादीत नाव गेलं ..आणि तो हि श्रीमंतांच्या लिस्ट मध्ये आला .. भले आमचं नाव वर खाली असलं तर आम्ही एकत्र होतो हे खूप मोठं होत आमच्या साठी ..
बिझनेस आमच्या रक्तातच होत… हे आम्हाला खूप काही केल्यावरच कळलं .. पण
जर भावाने त्याचा बिझनेस माईंड जर त्याच्या सासऱ्यांच्या बिझनेस मध्ये वापरला नसता तर …
जर भावाने मला त्या हिल स्टेशन वरून सोबत घेऊन गेला असता तर.. ..
जर छोट्या भावाने घरच्यांना सांभाळून घरीच प्रेस कंपनीचा विचार न करता नौकरी केली असती तर. ..
हे जमलं असत !!!!??
नाही… निस्रगाने सगळ्यांना सारखेच पर्याय आणि बुद्धिमत्ता दिली आहे ..त्याचा वापर करून कसा स्वतःला आणि समाजाला मोठं करता येईल .. हेच बिझनेस माईंड शिकवतो आपल्याला.. लक्षात ठेवा.. income source वाढवायची गरज आहे .. त्याकडे फक्त लक्ष द्या… कितीही कठीण परिस्थिती असुद्या मार्ग निघतोच…