मेंदूचे नियम-
मेंदूचे वेगवेगळे कार्य आहेत. याबद्दल आपल्याला सांगत आहेत जॉन मेडीना.
ते एक व्यवसायाने शिक्षक आहेत आणि त्यांनी मानसशास्त्रावर १० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.
आज त्यांच्या ब्रेन रुल या पुस्तकामधली काही बाबी बघूया
त्यांनी मेंदूबद्दल काही नियम सांगितले आहेत.
मेंदू शक्तिशाली करण्यासाठी हे नियम गरजेचं आहे.
१) व्यायाम-
आपण आपल्या पुर्वाजाबद्दल खूप ऐकतो.
ते खूप शारीरिक व्यायाम करायचे. त्यांचं प्रत्येक काम हे शारीरिक असल्यामुळे त्यांचा एक प्रकारे व्यायाम होतो.
आताच्या जीवनशैली नुसार बऱ्याच जणांना व्यायाम करायला पुरेसा वेळ किंवा इच्छा होत नाही.
त्यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि अनेक रोगांना आपण स्वतःहून आमंत्रण देतो.
मेंदूला जर शक्तिशाली बनवायचे असेल तर व्यायाम हा गरजेचं आहे.
जेवढा तनाने ताकदवान असाल तेवढंच मनाने असाल आणि तेच त्याच उलट सुद्धा आहे.
त्यामुळे व्यायाम रोज करणे गरजेचं आहे.
२)टिकाव- तग धरून राहणे-
सिम्बॉलिक रिझनिंग मुळे आपण स्वतःचा टिकाव करू शकलो.
सांकेतिक भाषा आणि हातभाव करून आपण आपली भाषा आणि इतर माहितीची आदानप्रदान करू शकतो.
हीच गोष्ट माणसाला पशु पासून वेगळी करते.
परिस्थिती कशीही असली तरी आपला मेंदू त्यातून मार्ग काढून आपल्याला सुरक्षित ठिकाणी पोहचण्यासाठी संदेश देत असतो.
त्यामुळे संकटसमयी निराश न होता विश्वास ठेवा कि काहीतरी मार्ग मिळेल ज्याने आलेले संकट दूर होईल.
निसर्गात होणाऱ्या बदलासोबत आपण हि बदलत गेलो. त्यामुळे बदल हा आपल्या प्रगतीचा भाग असला पाहिजे.
कोणत्याही क्षेत्रामध्ये जर वेळेनुसार बदल झाला नाही तर तो बदल वेळेच्या पुढे जाऊन त्या क्षेत्राला मागे टाकू शकते उदाहरण द्यायचं राहील तर,
नोकिया कंपनी मोबाईल मध्ये अग्रेसर कंपनी होती पण,
अँड्रॉइड च्या जमाना मध्ये स्वतःच्या प्रॉडक्ट मध्ये बदल करण कंपनी ला विशेष वाटलं नाही.
वेळेनुसार बदल न केल्यामुळे मोबाईल क्षेत्रात अग्रेसर असणारी कंपनी आज खूप मागे आहे.
हाच नियम सर्व क्षेत्रात सारखा आहे बदल हि गोष्ट अनिवार्य आहे.
आपल्या मेंदूचे २ मुख्य वैशिष्ट आहे,
१)आपण जेव्हा चुका करतो तेव्हा आपल्याला मेंदू आपल्याला अलर्ट करतो.
२) आणि जेव्हा आपण त्या चुका करतो त्या चुकांतून सुधारणा आपण करू शकतो.
याच बदला मुळे आज मानवजात इतके वर्ष टिकून आहे.