तुम्हाला जिनी ची गोष्ट आठवतेय का? जास्मीन-अल्लादिन-जिनी. कार्टून नेटवर्क वरती लागत असे. मला ते अजूनही आवडते. विल स्मिथ या माझ्या आवडत्या कलाकाराने जिनी ची भूमिका केली आहे.
सगळ्यांनाच माहिती आहे जिनी काय करतो ते. तुम्ही सांगाल ते तुम्हाला आणून देतो. मग ते काहीही असू दे. जिनीला काही फरक पडत नाही. तुम्ही चांगल मागता की वाईट. तो फक्त तेच करेल जे तुम्ही त्याला सांगता.
विचार करा असा जिनी जर तुम्हाला भेटला तर, हवं ते मागू शकता त्याच्या जवळ आणि तो तुम्हाला आणून देईल. कोणत्याही परिस्थितीत. मजा येईल ना। सगळेच म्हणतील,”जिनिभावा 100 करोड रुपये खात्यात टाक, एक आलिशान घर बनव आणि एक झकास लाईफ पार्टनर दे!”बाकी दुनियेचं काही पडलेलं नाही”.
काहीजण वेगळं मागतील, आपल्या आवडीनुसार, वेळेनुसार, वयानुसार पण मागतील हे नक्की. तुम्हाला हवं ते आणून देणारा जिनी भेटत असेल तर कोण हरिश्चंद्र बनेल. सर्वजण काहितरी मागणारच. त्यामुळे मागण्या काही कमी होणार नाही आणि अश्या मागण्या पूर्ण करणारा जिनी हवाच.
मी जर म्हणालो, आपल्याला हवं ते आणून देणारा जिनी आपल्यासोबत24 तास असतो तर! फक्त आपण त्याला नीट ओळ्खलेलं नाही. आत्तापर्यंत आपण जे काही मिळवलं ते या जिनीमुळे मिळालं आहे. तुमच्या कडे जे काही आहे ते याच जिनीने तुम्हाला आणून दिले आहे.
पटवून देऊ का?? डोळे बंद करा. खरच बंद करा. आणि एक गरम दुधाचा ग्लास मागा. मागितलं का? तुम्ही म्हणाल, मागितलं पण इकडे तर काहीच नाही. परत एकदा मागा डोळे बंद करून जेणेकरून तुम्हाला ते दिसेल. काहीजणांना पटेल, की हो डोळे बंद केल्यावर एक गरम दुधाचा ग्लास दिसतो पण उघडल्यावर नाही दिसत. डोळे बंद केल्यावर एक गरम दूध दिसत असेल तर ते दूध तुमच्या जिनी ने तुमच्या साठी आणले आहे. फरक एवढाच आहे की ते वास्तविक मध्ये नसून काल्पनिक मध्ये आहे. हा जिनी म्हणजेच तुमचा मेंदू आहे.
ही मस्करी नाही. या गोष्टीला जगातले फक्त 3% लोक समजू शकले आहेत ज्यांच्या जवळ 97% संपत्ती आहे. आणि ज्यांना नाही समजलं ते 97% मध्ये मोडतात ज्यांच्या कडे 3% संपत्ती आहे. 3% लोकांना नक्की काय समजले?? ते मेंदूच्या पूर्ण क्षमतेला समजले आहेत. आपल्या मेंदूच्या क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांचा पूर्ण विश्वास आहे की, ते कल्पनेत जे काही मागतील ते त्यांचा मेंदू किंवा बुद्धी त्यांना आणून देईल.
वैज्ञानिक प्रयोगाने हे सिद्ध झाले आहे की, मेंदूला वास्तविक आणि काल्पनीक यांचा फरक नाही पडत. मेंदूने त्याच काम केलेले असते. जेव्हा तुम्ही एक गरम दूध याचा विचार करता तेव्हा तुमच्या कल्पनेत त्याची प्रतिमा उभी राहते. त्याच वेळी मेंदूने तुमची मागणी पूर्ण केलेली असते. त्याला फरक नाही पडत ही गोष्ट काल्पनिक आहे की वास्तविक मध्ये. पण जेव्हा तीच गोष्ट वास्तविक मध्ये हवी असते तेव्हा मेंदू तुमच्याच साहाय्याने एक गरम दूध करुन देतो.
गोष्ट साधी सरळ आहे पण भन्नाट आहे. तुम्ही गाडी मागून बघा. लगेच एक प्रतिमा तयार होते, जेव्हा ठरवता की वास्तविक मध्ये हवी आहे. तेव्हा तुमचा जिनी(मेंदू/बुद्धी) तुमच्या जवळ असलेले सर्व पर्याय तुम्हाला सांगतो. ज्या पर्यायाने तुम्ही गाडी वास्तविक मध्ये आणू शकता.
तुम्ही फेरारी मागाल का?? जगातल्या महाग गाड्यापैकी एक आहे. आता तुम्ही म्हणाल,”खूप महाग असते ही गाडी, आणि एवढ्या पैश्याची व्यवस्था ही नाही होणार”. हे असं बोलता आणि इथेच मार खाता. आपल्या बुद्धीला याचा काहीच फरक नाही पडत की तुम्ही काय मागता. फेरारी घेण्यासाठी मेंदू पर्याय तयार करणारच, कामच आहे ते त्याच. फक्त तुम्ही तुमचा विश्वास गमावू नका आणि “हे होणार नाही” असं बोलून हातची संधी घालवू नका. फेरारीसाठी मेंदू माहिती गोळा करेल, त्याचा रंग असा आहे, वेग एवढा आहे, किंमत एवढी आहे. मेंदूने समोर ठेवलेल्या प्रदर्शनाला होकार द्या आणि म्हणा,”ठीक आहे, मला आता विकत घ्यायची आहे”. यावेळेला मेंदूचं दुसरं काम चालू होतं. तो तुमच्या कडे असलेले पैसे आणि तुम्हाला भेटू शकणारे पैसे याचा हिशोब लावतो. त्या पैशात हे काम होईल की नाही हे सुद्धा सांगतो. जर नसेल होणार तर त्यासाठी पर्याय सुद्धा शोधतो जेणेकरून हे काम होईल. मेंदूचं तेच काम आहे, तो तोपर्यंत पर्याय शोधणार जोपर्यंत तुम्ही तुमची मागणी नाकारत नाही.
तुम्हाला फक्त मागायचं आहे. लक्ष्यात ठेवा, कुंभार एकच मडकं दोन वेळा बनवतो, आधी मनात आणि नंतर ते खऱ्या स्वरूपात. जे काही मागाल ते तुमचा जिनी तुम्हाला आणून देईल. तुम्ही गरीब असाल पण तुमचा मेंदू/बुद्धी श्रीमंत आणि समृद्ध आहे. जगातली कोणतीच गोष्ट त्यांच्या साठी अशक्य नाही. तुम्हाला हवं ते , ते काल्पनिक आणि वास्तविक मध्ये आणून देतील, फक्त आपल्या बुद्धी ने सांगितलेल्या पर्यायावर विचार करून योग्य निर्णय घेता आला पाहिजे.
मेंदू/बुद्धी अनंत शक्तींनी बनलेला आहे, श्रीमंत आणि समृद्ध आहे, परिपूर्णतेने नटलेला आहे. त्यांच्या क्षमतेवर पूर्ण मनाने विश्वास ठेवा.
खऱ्या जिनीला ओळखलं का????
