हळू हळू माणसं घरात यायची वेळ झाली, आपल्याकडे ओव्हरटाईम हा प्रकार असतो तो काहीसा इकडे दिसून येत नाही.
बाबानी त्यांच्या मुलांची ओळख करून दिली. त्यांना तीन मुले होती तिघेही घरीच काम करत होते. घरात गुरं होती त्यामुळे दूध भरपूर, शेती असल्यामुळे भाजीपाला हि अमाप.
आणि लहान मुलाने तर दुकान थाटल होत तालुक्याला त्यामुळे घरात कश्याची कमी असेल वाटत नव्हतं.
सगळ्यांशी छान बोलणं झालं. माझं शिक्षण-घरचे सगळे चौकशी करत होते. मला पण पाहुणा असल्यागत थोडं वाटलं पण नंतर मग त्यांनी घरातलाच असल्यागत रहायला सांगितलं.
आपण फक्त आजची रात्र आहोत हा विचार करून डोळे मिटले, जागा नवीन होती त्यामुळे सहाजिकच झोप लागण अशक्य होतं. पण त्या जागेत मला वेगळाच अनुभव आला.
अशी शांतता क्वचितच दमून थकून आल्यावरती लाभते. मनोमन त्या विठूरायाची आठवण काढली. आणि त्याच ते रूप मनात आठवण हरिनामाचा जप करून झोपी गेलो.
जे निद्राधीन झालो ते प्रातःकाळ ला जाग आली. मी जागा होण्याच्या आधीच घरामधल्या माणसांची तयारी झाली होती. मी माझं उरकलं. आणि त्यांनी नाश्ता दिला.
मी माझी तयारी केली. तिथल्या लोकांची गाठभेटी घेऊन त्यांचे आभार मानले. आणि मी पुढच्या प्रवासाला निघालो. शहरातल्या लोकांना क्वचितच अशी शांतता भेटते. किंबहुना भेटतच नाही.
अश्या या शांततेसाठी का होईना प्रत्येकाला गाव हवं. नदीच्या शेजारी, डोंगराळ भागात हे गाव अगदी तसच होते.
इकडची माणसे चौकशी खूप करतात, याच कारण मला लगेच नाही कळालं, पण जेव्हा पण मोबाइल बघतो, त्याचा वापर करतो, तेव्हा हि गोष्ट हळू हळू कळाली.
आपला मोबाइल पण नेमकं काय आहे , माहिती साठवण्याचं एक साधन. तश्याच प्रकारे येथील माणसे चौकशी करून स्वतःकडे माहिती जपून ठेवतात.
येणाऱ्या जाणाऱ्या ची चौकशी करणे हि राजहिता साठी आवश्यक का आहे? हे आज मला कळले. या गावात तस प्रत्येक घराची माहिती इथल्या प्रत्येकाला असते, आणि ती फायदेशीर सुद्धा आहे. कोण कधी मदतीला येईल सांगता नाही येत. तसेच सगळ्याच गोष्टी माहिती असणं सुद्धा नुकसानदायक असते. काही भाग हा कोणाला न कळलेलाच बरा असतो.
गावची हि आठवण ठेवून मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो.
भाऊ ललित लेखाचे तीनही भाग जबरदस्त आहेत… वाचतांना माणूस खिळून राहतो… फारच सुंदर… पुढील भागांची आतुरता आहे…. 😊🙏😊🙏😊🙏😊