भाजणीसाठी साहित्य
१ किलो तांदुळ
अर्धा किलो चणा डाळ
पाव किलो उडीदडाळ
२०० ग्रॅम मुगडाळ
दोन मुठ जाडे पोहे
एक मुठ शाबुदाने
१ मोठा चमचा जिर
एक चमचा ओवा
एक मोठा चमचा धने
भाजणीची कृती:
तांदुळ स्वच्छ धुवुन वाळवुन घ्या.आणि जर वेळ कमी असेल तर तांदूळ एका ओल्या फडक्यात ठेवून जरा चोळून घ्या आणि थोडे वाळवा.डाळी कडक उन्हात २-३ दिवस तापवुन घ्या म्हणजे लवकर भाजल्या जातात.
वरील सर्व जिन्नस एक एक करुन मध्यम आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजावे व दळून आणावे. सफेद तीळ दळून आणल्यावर किंवा चकली पीठ मळताना टाकावे. हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत सिल करुन ठेवावे म्हणजे वास उडत नाही.
आता या तयार भाजणीची चकली बनवायची कृती आणि साहित्य:
५०० ग्रॅम चकली भाजणी
2 टेबलस्पून तिखट मिरची पावडर
१ टेस्पून लाल रंगाची पावडर
1टेबलस्पून हळद
मीठ चवीनुसार
2 टेबलस्पून तीळ
1 टिस्पून ओवा
दोन चमचे तेल
जेवढी वाटी भाजणी घेतली तेवढ्याच वाट्या पाणी उकळत ठेवा. पाण्यामध्ये मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घालून उकळी आणावी.उकळी आलेल्या पाण्यात तेल, तीळ आणि ओवा मिसळून २ मिनिटे उकळी काढावी.
नंतर यात भाजणीचे पीठ घालून उकड तयार करून घ्यावी उकड जास्त पातळी नको आणि घट्ट ही नको. जशी भाकरीसाठी उकड काढून घेतो तशी असावी आता तयार उकड एका परातीत काढून कोमट करून घ्यावी आणि कोमट पाण्याचा हात लावून मळून घ्यावी.
पिठ चकली बनवण्यासाठी योग्य तयार झाले आहे कि नाही तपासण्यासाठी एक गोळा बनवून दोन हातांच्या मधे दाबावा जर कडेला भेगा गेल्या तर पीठ अजून पाण्याचा हात लावून मळावे.
साच्याला आतल्या बाजूने तेल लावून साच्यात मावेल इतका पिठाचा गोळा पुन्हा हलका मळून साच्यात भरावा.आता मस्त गोल चकल्या करून गरम करून तळाव्यात. आणित्यांना टिश्यूपेपरवर काढून थंड कराव्या व हवाबंद डब्यात ठेवाव्यात.