आपला बँकेचा emi आपल्या पगाराच्या किती असावा? जाणून घ्या.

मागच्या लेखा मध्ये आपण पगाराविषयी बोललो, आता आपण एका विषया बद्दल बोलणार आहोत जो आपल्या सर्वाना अनुभवाचा आहे तो म्हणजे बँकेचा EMI. पगार झाला कि आपण लगेच काहीना-काही खरेदी करायचा विचार करतोच. त्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे मोबाईल घ्यायची आणि तो बरेच जण हफ्त्यावर घेतात. अशीच ऑनलाईन खरेदी आपण वारंवार करतो, तेव्हा आपण खरेदीचा आनंद घेत राहतो पण हफ्ता किती जाईल आणि मग पगारातून जाऊन शिल्लक किती उरेल याचा विसर पडतो
मागच्या लेखात बँकेचा हफ्ताचं नियोजन घेतलं नव्हतं याच कारण की पगाराचे सुरवातीचे नियोजन हे आपले नेहमीच बचतीचे असले पाहिजे आणि तिकडून ते गुंतवणुकी पर्यंत त्या नंतर खर्चाचा विचार करायला हवा. एखादा खर्च अवश्य असल्यास त्याची आधी पासूनच तरतूद कशी करावी हे हि आपण या लेखात करणार आहोत.
प्रत्येकाला हौस असते कि आपल्या पहिल्या पगारातून काहीतरी आपल्या आठवणीत राहावं असं काहीतरी घ्यावं, हे चांगलाच आहे. पण पगाराच्या बाहेरची खरेदी नेहमीच टाळावी, नाहीतर मग उधारीवर घेण्याशिवाय पर्याय नाही. आता तशी सोया हि आहे zero interest emi.
एक उदाहरण आहे, गणेश चा पगार २३०००/- महिना पडतो.  आता त्याच्या पगारच गणित मांडू, २३०००/- मधून ३०% (६९००/-)बचत + २०%(३२२०/-)स्वतःसाठी महिना खर्च + ५०००/-(घर खर्च) उरलेल्याचे दोन भाग ३९४०+३९४०= २३०००/-. शेवटी ३९४०/- रक्कम एवढी उरते. हि रक्कम सर्व खर्च जाऊन उरते आणि जेव्हा काही अडचण असेल किंवा मोठा खर्च असेल तेव्हा हि रक्कम उपयोगात येते. जर काही ऑनलाईन घ्यायचे असेल तर त्याचा emi ३९४०/- पेक्षा जास्त नसावा.
काही महिने काम केल्यानंतर गणेशला वाटलं कि tv खरेदी करावा. म्हणून त्याने दिवाळी च्या ऑफर मध्ये tv घ्यायचं ठरवलं. दिवाळी ऑफर ला भुलवून गणेश ने tv बुक केला तो हि ४५००/- महिना वर. तो हि ४२ इंच.एकूण १० हफ्ते म्हणजे ४५०००/- ला tv पडला.
भावेश ला सुद्धा tv घ्यावासा वाटलं, त्याचा पगार १७०००/- पण त्याने गणेश सारखी घाई नाही केली. थोडी माहिती काढली. गणेश आणि भावेश च घर सारखंच. tv घेताना आपण जिकडून tv बघतो आणि tv याच्या अंतरवून tv ची निवड करावी. या माहिती वरून भावेश ला आणि गणेश ला ३२ इंच tv ची गरज होती.पण गणेश ने इच्छा म्हणून ४२ इंच ची tv घेतली आणि ३२ इंच tv ती येत होती २० हजार ला आणि ऑफर मध्ये १७५००/- पर्यंत त्याला येत होती म्हणजे emi जरी लागला तरी १७५०/- चा लागेल.
मागच्या लेखात जे सूत्र मी सांगितले होते त्या नुसार सर्वकाही जाऊन गणेशकडे स्वतःचे ३९४०/- येतात. आणि भावेश कडे २४००/- जर गणेशने खरेदी करण्याच्या आधी स्वतःकडे शिल्लक किती राहतात आणि हफ्ता कसा पडतो याचा विचार केला तर तर कदाचित गणेश ने घाई केली नसती. गणेश गरजेपेक्षा जास्त emi भरत आहे.

नेहमी आपल्या पगारच नियोजन करावं तेही असं असलं पाहिजे जेणेकरून आपल्या गरजाही भागातील आणि अडीअडचणीला उपयोगी हि पडतील. त्यासाठी शिष्त खूप गरजेची आहे. गणेश आणि भावेश दोघांनाहि एकच इंच tv ची गरज असली तरी गणेश ने पगाराचे नियोजन न करताच निर्णय घेतला. भावेश चा पगार कमी असूनही त्याच्या कडे असलेले पैश्यामधून tv हफ्ता जाऊन त्याच्या कडे ५००/- उरतात तर गणेश चा ५६०/- जास्त खर्च होतो.

याच्या उलट जर त्यांनी हफ्ताचा विचार न करता tv घ्यायचा विचार केला असता तर गणेश ला फक्त ५ महिने लागले असते tv ची पूर्ण रक्कम भरायला (३२ इंच tv १७०००/-) आणि भावेश ला ८ महिने.
या उदाहरणा वरून हे नक्की ठरत कि आपण कधी कधी ऑनलाईन खरेदी करताना घाई करतो आणि आपले वाचणारे पैसे सुद्धा आपण घालवून बसतो. गणेश चे एकूण ४५०००/- गेले आणि भावेश चे त्याच्या निम्मे पेक्षा कमी पैसे गेले. म्हणून पैश्याच नियोजन काटेकोरपणे आणि शिस्तबद्ध केले तर आपल्याला कधीच कसलीच अडचण जाणवणार नाही.

याच्या पुढच्या भागात कर्जा विषयी बोलणार आहोत.

(वाचा)पगारच गणित समजून घ्या  

(वाचत राहा +शिकत राहा= majeman.com )

By Chandrakant Ubhe

like to Reading New thing, Travel, listening music and watching movie

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *