खूप साधा सरळ प्रश्न पण त्याच उत्तर खूप वेळा सरळ नसते. भीती हि वाटतच राहते मनाला, कितीही नियंत्रण जरी मिळवले तरी. आणि मग त्या भीती मुळे आपल्याला योग्य तो निर्णय घेता येत नाही.
सर्वांचीच एक सामान्य भीती असते वर्गात जेव्हा शिक्षक आपल्याला पुढे येऊन वाचून दाखव असं म्हणतात तेव्हा येणारी भीती. हि भीती कदाचित सगळ्यांच्या आयुष्यात येणारी पहिली भीती असावी. आणि जे या भीती वर मात करतात पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागते ते त्या शिक्षकांनी केलेल्या सहकार्यामुळे. पण काहीजणांना शालेय जीवना नंतरही भीती वाटत राहते.
जेव्हा ते नोकरी साठी मुलाखत देतात तेव्हा हि भीती प्रकर्षाने जाणवते. आजही बरेच जण मुलाखतीला घाबरतात आणि ते जात नाही. त्यांचं शिक्षण हि उत्तम असते तरी हि मंडळी मुलाखतीला घाबरतात. त्यांचं प्रशिक्षण कुठे तरी कमी पडलेले असते. स्वतःवर ते काम नाही करत.
स्वतःच्या मनातली भीती ओळखता आली पाहिजे. आणि एकदा का ओळखली कि मग त्यावर काम करण सोप्प पडत. आज माझा ड्रायविंग स्कूल चा तिसरा दिवस होता, याच्या आधी हि गाडी हाता मध्ये घेतली होती पण तेव्हा बाबा शिकवत होते तेव्हा हि भीती वाटत होती आणि आज हि वाटली. पण जर हि भीती अशीच ठेवत राहिलो तर मी गाडी कधीच शिकू शकणार नाही.
मनातली असलेली भीती हि अशी चटकन जात नाही. त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. शांत राहून समोर असलेल्या गोष्टीचा जर नीट विचार केला तर आपली चूक हि कळते आणि मनात येणाऱ्या भीती वर उपाय हि सुचतो.
मनात वाटणाऱ्या भीती बद्दल हलकासा जरी विश्वास आला ना कि, हो ! हे आपल्याला जमू शकत. मग हळू हळू त्या भीती ची जागा तो विश्वास घेऊ लागतो. आणि मग एकदा सवय झाली कि त्या गोष्टी आपोआप होऊन जातात.
बरेच जण आहेत ज्यांना ड्रायविंग करताना कोणता विचार करावा लागत नाही. त्यांची ती सवय होऊन जाते. हि सवय होई पर्यंत तरी थोडी भीती राहतेच.
मला आज हि आठवतंय सात आठ वर्षांपूर्वी बाबांनी गाडी हातात दिली होती. गावातल्या मोठ्या मैदानामध्ये ते शिकवत होते. बाबांचं कसं होत कि त्यांना वाटायचं पहिल्या बैठकीत गाडी शिकली पाहिजे. आणि मला कोणती गोष्ट अशी लवकर शिकता नाही येत थोडा वेळ मी घेतोच.
जे काही शिकायचं असे ते मी माझ्या मना प्रमाणे शिकतो. मग कोणाची काहीही तक्रार असो त्याकडे मी लक्ष नाही देत. झालं असं कि, पहिल्याच दिवशी मैदानावर बाबानी थोडं सांगितलं आणि गाडी चालू केली पहिल्या गियर होती गाडी आणि मूल खेळात होती त्यामुळे ती हि भीती होती.
एक दोन मिनिट मध्ये त्यांनी गियर बदलला दुसऱ्यावर घेतला आणि नंतर तिसऱ्यावर पहिल्याच दिवशी बऱ्याच गोष्टी अंगावर आल्यासारखं झालं. मुलं खेळत होती आणि त्यात मी गाडी तिसऱ्या गियर चालवत होतो. काही झालं तर या भीती ने मी ब्रेक दाबून गाडी थांबवली. बाबांना ते आवडलं नाही म्हणाले तू चालावं त्यांना काही होत नाही. आणि मला ते पटलं नाही मी गाडी तिथेच सोडून घरी निघून आलो.
तेव्हा पासून ची भीती अजूनही आहे, आज परत ती जाणवली. होईल कमी. थोडा वेळ द्यावा लागेल.एकदा का विश्वास निर्माण झाला मनात मग भीती वगैरे काही वाटत नाही. भ्रम वाटायला लागतो भीती म्हंटल की.
आपल्या मनातल्या भीती चे काय कराल?
