माझं नाव भूषण, ऋषिकेश आणि यश असेल
माझा सैनिक दहशद वाद्यांना म्हणतोय,
तुम्ही एकदा माराल मला
मी हजारदा लढेल
माझं नाव भूषण, ऋषिकेश आणि यश असेल
तुम्ही धर्माच्या नावाने लढा,
मी धर्मा साठी लढेल,
खरा धर्म काय असतो,
हे दाखवून मी मरेल,
तुम्ही बंदुकीने माराल,
मी विचाराने जगेल,
माझं नाव भूषण, ऋषिकेश आणि यश असेल
कुठपर्यंत माराल तुम्ही
तुम्ही मारून मारून थकाल,
आम्ही हजाराच्या संख्येने उभे राहू
तुम्ही कितपत टिकाल,
मी शरीराने जरी मेलो तरी
विचाराने जिवंत असेल
माझं नाव भूषण, ऋषिकेश आणि यश असेल
या युद्धात तुम्ही जिंकणार नाही,
विसरलात तर आठवण करून देईल,
कारवाया जर थांबल्या नाहीत,
तर परत घरात घुसून मारिन,
तेव्हा मी एका नवीन वर्दीत दिसेल,
माझं नाव भूषण, ऋषिकेश आणि यश असेल.
©चंद्रकांत शंकर उभे (९७०२९४६७७५)
(www.majeman.com)