एक सुप्त संध्याकाळ ,मनसोक्त माझ्या विचारात मी ,
आठवणीचे हुंदके मनाला भेदून जात होते,
विचारांच्या साखळीला तोडून जात होते,
अश्याच सायंकाळी। ..
ना नदीचा किनार, ना समुद्र किनारा दिसला,
सूर्यास्ता मधे रमलेला माधव मात्र भेटला,
विचारल स्वतःहुन , “का उगाच चिंता?”
मन खिन्न झाले ऐकून ,माधवा” तुला कस सांगू आता”,
“अर्जुनही चुकला नाही कधी , भोग मात्र अभिमन्यूला,”
“कुंतीच्या त्या इच्छेने मात्र , कलंकित केले कर्णाला”
“राणा, कधी संपणार न्याय तुझा हा ? कधी उगवणार ती पहाट?
बुद्धाच्या समर्पणाची, दाखवशील का रे वाट?
ऐकून प्रश्न माझे, हळूच मग हसला,
वेळेच्या गतिला थांबवून दृष्टांत मज दिला ,
“जन्मतास येती प्रश्न , मरणताच उत्तरे ”
“नर-नारी धर्म सोडुनी , सांग मज काय खरे”
“ना नर, ना नारी असा धर्म मज दाखव,
मग संसारतील प्रत्येक खुणाची”
“देतो मी उत्तरे वेंधळया , देतो मी उत्तरे”
ऐकून माझे प्रश्न हळूच मग हसला
