PART-3 HOW TO TACKLE FINANCIAL PROBLEM.
सुखाचं गणित
गणित हा विषय खूप आवडीचा आहे. त्यात बेरीज वजाबाकी करण्यामध्येच गम्मत असते. पगार चे गणित जमलंच पाहिजे. पगार कधीच पुरत नसतो तो पुरवावा लागतो. तो हि अगदी काटेकोर आणि शिस्तीने. याबाबतीत शिस्त फार महत्वाची. संयम आणि समजुतीने केलेल्या गोष्टीचा कधीच पछतावा होत नाही.
पगारच गणित कस मांडव याच कसब प्रत्येकाकडे असते असं नाही. बरेच जण चुकतात आणि मग एकदा गणित चुकलं कि मग उधारी नाहीतर क्रेडिट कार्ड चा अतिरिक्त वापर याही पलीकडे वारी चालू होते ती कर्जापर्यंत.
सूत्र (३०%+२०%+२५%+२५%) असे आहे. याचा नेमका वापर कसा करावा आणि हे सूत्र का वापरावे? याच स्पष्टीकरण हि पुढे असेल.
पगार कितीही असो, सुरवातीला ३०% बचत(SAVING ) हि पाहिजेच म्हणजे ३००००/- चे ३०% ९०००/- इतके पैसे दर महिना बचत झालीच पाहिजे. यात पण ज्यांचा पगार जास्त आहे त्यांनी आपल्या SAVING चे दोन भाग करावे एक मोठया कालावधी साठी आणि एक छोट्या कालावधी साठी जेव्हा गरज असेल तेव्हा अडीअडचणीला उपयोगी येते.
उरलेल्या पैशाचे २०% हि CASH LIQUIDITY म्हणून स्वतःजवळ ठेवावे. यात महिनाभरात होणारा खर्च भागवावा. यात घर खर्च किंवा घर भाडं समाविष्ट केले नाही. ३००००/- मधून ३०% वजा केले असता उरलेले रकमेचे २०% म्हणजे ४२००/- रुपये स्वतःकडे ठेवावे. उरलेली रक्कम १६८००/- असेल यात त्याचे घर खर्च महिना ७०००/- पकडला तरी त्याच्या हाती ९७००/-इतकी रक्कम राहते. या रकमेचे दोन सामान भाग करायचे. एक भाग ४८५०/- आपल्या खात्यात जमा करावी आणि दुसरा भाग ४८५०/- हा बायकोच्या खात्या मध्ये जमा करावा.
बायकोच्या खात्यात का जमा करावा याच नेमकं उत्तर द्यायचं राहील तर जसा आपल्या प्रॉपर्टी वर तिचा अर्धा हक्क आहे तसाच हक्क आपल्या पगारावर सुद्धा आहे. त्यामुळे इतर खर्च भागवून उरलेली रक्कम दोघात समान वाटप करणे नेहमी फायदेशीर.
एक वर्ष हे सूत्र वापरात आणलं आणि त्या पद्धतीने बचत व खर्च करत गेला तर एक वर्ष नंतर तुमची बचत १०८०००/- इतकी झालेली असेल आणि जे पैसे स्वतःच्या आणि बायकोच्या खात्यात जमा केली आहे त्याची रक्कम ११६४००/- इतकी असेल. तुमची बचत सोडून इतर जमा ११६४००/- एवढी आहे. हि जमा रक्कम CONTINGENCY म्हणून वापरावी. आपण भारतीय लोक आपल्याला बारा महिने बारा सण त्यामुळे खर्च तर आपल्याला आहेच. तो खर्च या खात्यातुन करू शकतो.
याच सूत्राचं पालन करून तुम्ही सुद्धा स्वतःची बचत वाढवू शकता.
सूत्र परत एकदा सांगतो.
पगार
=३०% बचत (१५%EQUITY+15%MUTUAL FUND OR १५%GOLD)
=उरलेली रक्कम*२०% ( प्रवास खर्च, स्वतःसाठी महिना खर्च)
=उरलेली रक्कम मधून घर भाडं+घर खर्च
=उरलेले रकमेचे दोन भाग एक स्वतःला आणि एक बायकोला . (CONTINGENCY )