PART-1 HOW TO TACKLE FINANCIAL PROBLEM
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. असं मी शाळेत पुस्तकांमध्ये वाचले होते. पण जसा शाळेतून बाहेर आलो आणि खऱ्या आयुष्यात जेव्हा वावरायला लागलो. तेव्हा समजलं की , खऱ्या गरजा वेगळ्याच आहेत.
गाडी,लग्न आणि घर या माणसाच्या सध्या मूलभूत गरजा झाल्यात. यात घर म्हणजेच निवारा काय तो मूलभूत गरजा मध्ये अजूनही टिकून आहे. पण जशी जशी लोकसंख्या वाढत आहे तस तशी राहायला जागा कमी पडत आहे. महागाईचा अंदाज घेतला तर काही शहरामध्ये हातभर जागेला सुद्धा मोठी किंमत मोजावी लागते. अश्या ठिकाणी भाड्याने राहणेच पसंत करतात. मुंबईच घ्या, दक्षिण मुंबई मध्ये दोनशे SQUARE फूट ची जागेची किंमती मध्ये बदलापूर मध्ये ३BHK रूम येईल.
बदलणाऱ्या जीवनशैली नुसार माणसाच्या मूलभूत गरजा सुद्धा बदलत आहेत. पण बदलणाऱ्या या गरजा भागवता भागवता नाकी नऊ येतात. त्यात आपला पगार येताना कासवा सारखा येतो आणि जाताना मात्र ससा सारखा भुरकन जातो. प्रत्येकाची एकच अडचण, पगार काही उरत नाही. मग वीस हजार असू दे नाहीतर साठ हजार.
यात अजून एक अडचण अशी झाली आहे की , जग हे खूप वेगाने बदलत जात आहे. आणि हा बदलणारा वेग सर्वकाही बदलत आहे. माणसाच्या स्वभाव सुद्धा या वेगा पासून सुटलेला नाही. आताच्या घडीचा माणूस इतका बदलत आहे कि त्याला सर्व गोष्टी फास्ट हव्या आहेत. छोट्या मोठ्या गोष्टी ना वेळ लागतो हि कल्पनाच त्याला सहन होत नाही. वेळ हा लागलाच नाही पाहिजे असा हट्ट आता सगळीकडे पसरत आहे. फास्ट फूड पासून ते फास्ट मॅरेज , फास्ट डिवोर्स पर्यंत सगळं काही फास्ट होत आहे. यांचे रिलेशनशिप सुद्धा असेच. आताची पिढी इतकी फास्ट फॉरवर्ड आहे कि त्यांना सगळ्या गोष्टी फास्ट हव्या आहेत.
इकडे वेळ कोणाकडे आहे, थांबला तो संपला, आपल्या कडे वेळ आहे हा माणसाचा भ्रम आहे.
हि त्यांची विचारसरणी त्यात काही अडचण नाही. माणसाने वेळेच्या पुढेच राहाव पण या सगळ्या धावपळीत त्यांची मानसिक ओढातान होते याकडे यांचं लक्ष नाही. मग तणाव सुरु होतो, चुका होतात, निर्णय घेता येत नाही, मानसिक दडपण वाढतं . कोणाजवळ मन मोकळ करता येत नाही. मग काय, फास्ट LIFE तस फास्ट DEATH. मागचा पुढचा विचार न करता सरळ टोकाचा निर्णय घेऊन मोकळे होतात. याना विचार करायला सुद्धा नको ,सरळ निकाल हाथी हवा.
कमी पगार ते कर्जबाजारी आणि तिकडून आत्महत्या हा प्रवास लगेच नाही घडत. पण हा प्रवास प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. काहीजण तिकडून बाहेर येतात पण काही जण येत नाहीत.
PART-2 HOW TO TACKLE FINANCIAL PROBLEM.