आलाच मनात प्रश्न कधी,
जगन कस जगायचं?
हातातल्या रेषांकडे नुसतं बघत हसायचं,
आभाळाकडं नजर टाकून इचार करत राहायचं.
असल येळ तुमच्याकडं कधी,
तर सामान घेऊन निघायचं,
दुनिया गेली तेल लावत म्हणत,
गड किल्ले हिंडायचं,
या मातीचा इतिहास आपला आहे
आपण इतिहास बनून जगायचं.
आलाच मनात प्रश्न कधी,
जगन कस जगायचं?
असलीच आवड खेळायची, पुस्तकाची
सकाळच्या पारी उठायचं,
जेवढं मनात काल ठसवलं,
आज परत तेच गिरवायचं,
बघितलेल्या सपनाला खऱ्या मध्ये उतरवायचं,
आलाच मनात प्रश्न कधी,
जगन कस जगायचं?
राहिलेच थोडं पैकं कधी,
मिजास नाही दाखवायचं,
चंगळ – मंगळ करून कधी,
उधारीत नाही जगायचं,
पैकाला पैका जोडत जोडत
गुंतून तेवढं ठेवायचं
आलाच मनात प्रश्न कधी,
जगन कस जगायचं?
आलीच थोडी प्रतिष्ठा कधी,
ओळख नाही विसरायचं,
काळ्या आईला इकुन कधी,
बंगलं न्हाई बांधायचं,
राहिलाच बंगला बांधायचा,
इमानात पैक कमवायचं
आलाच मनात प्रश्न कधी,
जगन कस जगायचं?
शेतात नाही पिकलं काही,
तर फासावर नाही चढायचं,
उधारीत आयुष्य गेलं अजून ,एकदा मागायचं,
जोड धंदा करून काही,
होतंय का ते बघायचं.
आलाच मनात प्रश्न कधी,
जगन कस जगायचं?
पडलीच पदरी निराशा कधी,
खचून नाही जायचं,
वीरमाता वीरपत्नींच्या
दुःखा समोर आपलं दुःख विसरायचं,
आपल्याला नाही जमलं तर
देशासाठी पिढयांना घडवायचं,
आलाच मनात प्रश्न कधी,
जगन कस जगायचं?
Apratim kavita ani arth