आज आऊसाहेबांच्या मनात आलं की, इतकी वर्षे झालीत आपले स्वराज्य कसे आहे त्या कडे बघावं.
म्हणून आऊसाहेब निघाल्या, पोरावानी सांभाळेल स्वराज्याचा विचार करून त्या निघाल्या. आऊसाहेब निघत आहेत हे बघून राजेंनी न राहवून विचारलं, “आऊसाहेब इतक्या घाईघाईत?” , “जाणाऱ्याला विचारू नये पण, राहवलं नाही, म्हणून विचारलं”. आऊसाहेब म्हणल्या, “तुम्हाला बघायचं आहे आम्ही कुठे जात आहोत तर, चला, न काही विचारता.”
आऊसाहेब आणि राजे निघाले, आऊसाहेब भराभर जात होते, जणुकाही एक माय आपल्या लेकराला बघायला कासावीस व्हावी तशीच काही अवस्था आईसाहेबांची झाली होती.
राजेंनी ओळखलं माँसाहेब स्वराज्यकडे जात आहे, राजे आणि आऊसाहेब दोघेजण रायगडावर आले, नेमकं आज राजांचीच जयंती होती म्हणून गडावर साफसफाई झाली होती ठिकठिकाणी रांगोळी होती, पताका, झेंडे यांनी रायगड भारून गेला होता,
रायगडाच रूप बघून राजे काहीकाळ भारावले , आऊसाहेबांना सुद्धा आनंद झाला, पण त्यांचा हा आनंद काहीच काळ होता, दोघांनी पण रायगडाच रूप आपल्या डोळ्यात साठवून माघारी जायचं ठरवलं.
परतून आल्यावर ,माँसाहेबाना रायगडच रूप डोळ्यासमोरून जाताजात नव्हतं, एवढा सुरेख ठेवला आपला रायगड, स्वराज्य पण असच ठेवलं असेल म्हणून आऊसाहेबांना परत स्वराजकडे ओढ लागली, निघणार तेवढ्यात त्यांनी राजांना सांगावा धाडला, आऊसाहेब परत स्वराज्यकडे निघाल्या, यावेळी मात्र राजेंची मुद्रा काहीशी ओसरली. राजेंचा पडलेला चेहरा पाहून माँसाहेब म्हणाल्या,” राजे इतका चेहरा पडण्या सारख झालं काय?”
राजे उत्तरले,” आऊसाहेब मागे आमची जयंती होती म्हणून रायगड नटलेला होता, आज अस काहीच नाही , आता जर तुम्ही त्याला बघाल तर ,नको तुम्ही न गेलेलं बरं”
राजांच बोलणं ऐकून आऊसाहेबना काय करावं सुचेना, माझ्या रायगडची ही अवस्था असेल तर स्वराज्य उरलं कुठे?
तक्षणी आऊसाहेब निघाल्या, राजेंना राहवेना , “आऊसाहेब येतो आम्हीपण”, म्हणत राजे ही निघाले.
आऊसाहेब गेल्या ते थेट, पुण्यातल्या कसबा येथील मंदिरात, मन पूर्ण भरेपर्यंत देवाचं दर्शन घेतलं , जिथून स्वराज्याची निर्मीती केली ते पूण पाहायला आऊसाहेब आल्या होत्या.
जगदेवाने पहार रोवून ठणकावून सांगितलं होतं इकडे जो कोणी आमच्या परवानगीशिवाय राज्य करेल त्याची अशीच अवस्था होईल , पुन भस्मसात करून स्मशानासारखी अवस्थेत टाकून गेला होता, तेव्हा त्यात पुण्यनगरीत आऊसाहेबांच्या पावलांनी स्वर्ग अवतरला होता. अश्या या पुण्याची अवस्था आज काय आहे हे वेगळं सांगायला नको.
आईसाहेबांच्या डोळ्यांना बघवेना, हेच होत का स्वराज्य यासाठीच का माझ्या लेकरांची कत्तली झालीत , त्यांचं रक्त ज्या स्वराज्या साठी गेलं ते हे स्वराज्य आहे?
आऊसाहेबांची अवस्था राजेंना बघवेना त्यांनी धीराने त्यांना थोडा वेळ शांत बसायला सांगितलं,
रयतेच्या गवताच्या देठाला सुद्धा हाथ घालू नये अन्यथा त्याचा परिणाम भोगावे, असा हुकूम असलेल्या राज्यात सर्रास भ्रष्ट्राचार होतो,
रांजणगावच्या पाटलाने केलेल्या अत्याचारच उत्तर राजांनी त्याचा चौरंग करून दिलं होतं, त्या राज्यात स्त्रीच्या अब्रूचे धिंडवडे उडतात,
गडकोट रक्षणासाठी बांधले होते, एक एक गड वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असूनही हा देश इतर भव्यदिव्य वास्तु बांधताना इतर देशांची मदत घेतो.
उभ्या आयुष्यात महाराजांनी कधी उत्सव केला नाही, आयुष्यात त्यांनी कोणत्या स्त्रीचा अपमान केला नाही, दुसऱ्यांचा सोडा पण कधी स्वतःचा अपमान सुद्धा सहन केला नाही अश्या राज्यात मराठी माणूस अपमान सहन करत दिवस काढतोय.
स्वतःच्या भाषेचा आब राखत राजांनी आपल्या शंभुराजेंना 16 भाषा अवगत करायला लावल्या, राज्य करायचं असेल तर जे जे काही लागेल ते करावं, अश्या राज्यात मराठीचीच गळचेपी होते,
ज्या राज्यांनी काही थोड्या पैशातून उभं केलेलं स्वराज्य राज्यभिषेक पर्यंत त्या स्वराजयची दौलत 4 लाख कोटी इतकी होते, अश्या राज्यातील मराठी तरुण राजांना सोडून इतरांना आपला उद्योगाचे शिखर मानतात अश्या राज्यातील लोकांबद्दल राजे काय बोलणार होते आऊसाहेबांना.
आऊसाहेबांना शिवाई देवी समोर घेतलेली शपथ आठवली, मनातूनच त्यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि राजेंना म्हणाल्या, ” चला राजे, जे होत ते आपलं होत, असेलंच जर कोणी आपलं तर राखील स्वराज्य” माँसाहेब आणि राजे काळाच्या पडद्यामागे निघून जातात.
Khupach chan