आज पाऊस पडतोय,या पावसाच्याही किती आठवणी असतात. पहिल्या मातीचा सुगंध अत्तरलाही त्याची जागा घेता येणार नाही इतका मोहक असतो.
पावसाच्या गार हवेत खमंग भजी नाहीतर पोहे खाण्याची इच्छा न होणारा अजून जन्मलाच नसेल. पहिल्या पावसाच्या आठवणी खूप असतात. आपल वय सरत जात आठवणी मात्र चिरतरुण राहतात.
पडणारा प्रतेक पाऊस काही आठवण ठेवून जातच असतो. उन्हाने तापलेल्या मनाला हा कोसळणारा पाऊस शांत करून जातो. तो सतत काही देत असला तरी आपल्याला त्याच्याकडे काही मागची ईच्छा नाही होत. फक्त पडत रहा! असच काहीसं मन बोलत असावं.
एकटेपणालाही खिंडार पडणारा पाऊस आपल्या सोबत कायम आहे याची जाणीव करून देतो. कोणी सोबतीला नसल तरी तो असतोच. निसरगच सर्वात मोठ देण आहे हे.
प्रतेक थेंबात तो जीवनदान देत असतो. पावसाची चाहूलच वेगळा आनंद देते, त्याच्या बरसणार्या सरी, मंद गार हवा, थंडगार वातावरण अश्या रम्य ठिकाणी कोणाला रमवास नाही वाटणार.
8 महिन्यांनी येणारा पाऊस वर्षभराच्या आठवणी ठेवून जातो. काही कटू तर काही गोड. क्षणात प्रशासनाचे वाभाडे काढून जातो तर कधी क्षणात होत्याच नव्हतं करतो. काहींना आशेचा किरण देऊन जातो तर काहींचा भ्रमनिरास.
आपल्यासारखा त्याला भेद नाही करता येत. श्रीमंत-गरीब, सगळ्यांवरती सारखाच पडतो. कुठे जात बघत नाही, कोणाचा वशिला बघत नाही, ना कोणाचं स्थान. सगळ्यांना आपल्या कवेत घेतो.