आज माझ्याकडे वेळच वेळ आहे. मला हव ते करता येतय, माझ्याकडे सर्वकाही आहे तरी आज सकाळपासून मी एका वेगळ्याच चिंते मध्ये आहे नेमकी कोणती चिंता आहे तेही कळेना. सुखावणार्या सर्ववस्तू जवळ असताना माझ मन इतक्या चिंतेत का? माझ मलाच समजेना. सकाळपासून फेसबूक, whatsapp, यूट्यूब सर्वकाही बघत आहे मन रमावण्यासाठी तरी मन कश्यात रमतच नाही.
माझी अवस्था आटपाट नगरातील राजा सारखी झाली, राजा कडे धन, दास दासी, हाथि घोडे, सर्वकाही होत. तरी त्याची चिंता काही केल्या दूर होईना. त्याच्या मनाला सुख लाभत नव्हतं अगदी तसच जस मला आता लाभत नाही.
राजाची चिंता पाहून अस्थमंडळ ही चिंतेत झाले त्यांनी राजाला विचारलं, “अन्नदाता कसली चिंता झाली?” राजन म्हणाला,” राज्यात सर्वकाही सुरळीत आहे, आपल वैभव बघून कोणी शत्रुत्व ही करत नाही ही चांगलीच बाजू आहे, पण, माझी मलाच चिंता लागली आहे.सर्व सुखवस्तू असूनही सुखाचा अनुभव नाही होत”.
राजन ची चिंता पाहून प्रधानने सेवकांना बोलावलं, आणि त्यांना हुकूम दिला जावा गावात दवंडी पिटवा जो “कोणी सुखी असेल त्याला घेऊन या”. राजा म्हणाला, “नको,”त्याचा सदरा जरी भेटला तरी खूप आहे”,”त्याचा सदरा घालून सुख भेटत असेल तर!”
सेवक निघाले, त्यांनी दवंडी पिटली,
“कोणी सुखी आहे का सुखी? कोणी सुखी आहे का होहोहोहोहो “!!!!!!!!!! ,”जो कोणी सुखी असेल त्याला राजन सुवर्णमुद्रा, हत्ती घोडे, दास दासी देईल होहोहो!!!आहे का सुखी कोणी ?”
सेवक सुखी माणूस शोधून शोधून दमले, पण त्यांना कोणी सुखी माणूस दिसेना. कारण कोणालाही विचारा सुखी आहात का? तो नाहीच म्हणायचा. दमले एकदाचे एका झाडाखाली बसले. त्यांच्या शेजारीच गावातला गाडी वाला बसला होता म्हणजे बैलगाडी वाला तो सामान आणि लोकांची ने आण करायचा त्यावरच त्याच भागायच.
एका सेवकाने विचारलं, “कसा आहेस बाबा?” तो बाबा म्हणाला, “बरं आहे लेका, देवच्या कृपेने सुखी आहे बघ”. त्यावर एक सेवक दचकला, तो बाबा कडे गेला आणि विचारलं ,”तुम्ही सुखी आहात? बाबा म्हणाला, “होय हाय की सुखी मी, का? काय झाल?” सेवकांना एकदम आनंद झाला म्हणाले, “ओ!बाबा द्या तुमचा सदरा द्या”,राजन ने मागितला आहे” बाबा म्हणाले, “सदरा! का? सेवक म्हणाला काय तुम्ही दवंडी ऐकली नाही का?
“कोणी सुखी आहे का सुखी? कोणी सुखी आहे का होहोहोहोहो “!!!!!!!!!! ,”जो कोणी सुखी असेल त्याला राजन सुवर्णमुद्रा, हत्ती घोडे, दास दासी देईल होहोहो!!!आहे का सुखी कोणी ?”त्यावर बाबा म्हणाला,”नाही ऐकली, अन माझ्याकडे कुठला आला सदरा, न्हाई बा! सदरा नाही माझ्याकडं”. सेवकांनी विचारलं,” सदरा नाही मग सुखी कसे आहात? गाडीवान रामा (बाबा) म्हणाला, “माझ सुख सदर्यात नाही मीच सुख आहे”
सेवकांनी ही गोष्ट राजाच्या कानावर घातली, राजा विचार करू लागला,’आता त्याच्याकडे सदरा नाही तरी हा सुखी कसा, माझ्याकडे तर मौल्यवान रत्नजडित सदरेसुद्धा आहेत. त्याने सेवकांना आदेश केला की,” जावा त्याला घेऊन या इकडे”. सेवकसोबत यावेळी प्रधान ही होते. प्रधान गेले आणि त्या गाडीवान ला म्हणाले, “चल तुला राजन ने बोलावलं आहे”. तो गाडीवान रामा म्हणाला, “मला! माझ्याकडे काय काम काढलं? मला आता लय काम आहेत राजन ला भेटायच असल तर त्याने याव इकडे”.
दुसर्या दिवशी राजन स्वतः गेले, म्हणाले, “रामा, सुवर्णमुद्रा, हत्ती घोडे, दास दासी हव ते घे पण मला सुखी होण्याच रहस्य सांग “.गाडीवान रामा झोपेत होता, त्याने झोपेतच बरळत सांगितलं,”माझे बैल आराम करत आहेत, आता गाडी कुठे जाणार नाही”. प्रधान म्हणाला, “अरे! राजन स्वतः आलेत,ऊठ!” गाडीवान काही उठला नाही.
तिसर्या दिवशी राजन परत आले, यावेळी भरजरी सदरा घालून घोड्यावर बसून आले, राजन परत म्हणाले, “रामा, सुवर्णमुद्रा, हत्ती घोडे, दास दासी काय हव ते माग पण मला सुखी होण्या बाबतच रहस्य सांग”
रामा हसायला लागला, म्हणाला, “जो स्वतः सुखाची खाण आहे त्याला लालच दाखवायच काम मूर्खच करू शकतो”. जा राजा जा, परत कधीतरी भेट”. राजा परत गेला त्याला समजलच नाही शेवटी गाडीवान रामाला काय हवय.
काही दिवसांनी राजा परत आला, यावेळी त्याच्या सोबत कोणी नव्हतं, एकटा आणि फक्त धोतर आणि एका पटक्यात आला होता. रामा ने ओळखलं. रामा म्हणाला,”अरे तू परत आलास!’ राजाला काही केल्या राहवेना म्हणाला,”जो पर्यन्त तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी असाच त्रास देत राहील”
राजा रामा पुढे हात जोडून उभा होता. रामाने सांगितलं चल माझी पाठ दाब मग सांगेल. राजन,” जशी तुमची ईछा” बोलून त्याने त्याची पाठ दाबली. तेवढ्यात रामा हसाय लागला. म्हणाला, राजन राहू दे! निट बस, पहिलाच जर मिरवायच ओझं सोडून आला असतास तर आता ही वेळ आली नसती”.
रामा आणि राजन यांचा संवाद –
रामा -“बैस, विचार काय विचारायच आहे.” राजन- “हे कसलं रहस्य आहे ज्याच्या कडे शेकडो सदरे आहेत तो सुखी नाही आणि ज्याच्या कडे एक अंगवस्त्र नाही तरी तो सुखी आहे”? रामा- राजे, सुखाच कारण सदरा नाही तर आत्मा आहे, ज्याला हे कळत की सुखाच कारण अंतरमन आहे त्याला बाहेरील सुखवस्तू ची गरज नाही लागत.
राजन- पण मन तर सुखासाठी नेहमी बाहेरील सुखवस्तू साठी धावत असत. रामा- म्हणून तर राजे जो आपल्या आनंदस्वरूप आत्मा ला समजून घेतो तो बाहेरील सुखवस्तू च्या मागे नाही जात.
राजन- मी समजलो नाही.
रामा- राजे आनंद आत्माचा स्वरूप आहे, आत्मा अनंत आहे त्यामुळे आनंद ही अनंत आहे. आत्माच्या या स्वरूपा मुळे माणूस स्वतःवर प्रतेक क्षण प्रेम करत असतो. कधी विचार केलाय माणूस म्हातारा होतो, शरीरात ताकद नसते, अवयव कमजोर पडतात,मृत्यू दारात उभा असतो , तरी तो माणूस जगाची आशा करत असतो, का? कारण प्रतेक माणूस स्वतः वरती प्रतेक क्षणी प्रतेक वेळी प्रेम करत असतो. जर दुख स्वतः च स्वरूप असत तर माणूस स्वतःवर एवढ प्रेम करू शकला असता? कधी केलास का विचार, आत्महत्याचा विचार का येतो?
राजन- नाही मालिक
रामा- काय आहे हा विचार, का माणूस भावनाच्या भरात तन, मन, बुद्धी आणि आत्मा संपवण्याच बघतो. कारण आत्महतेचा विचार ही आत्मप्रेम प्रकट करत असतो. जेव्हा माणूस दुख आणि दुख देणर्या गोष्टी पासून त्याची सुटका होत नाही तेव्हा तो अज्ञानामध्ये आत्महत्येलाच दुखा पासून मुक्ति मिळण्याचा मार्ग समजत असतो. इतक प्रेम असत की तो स्वतचे अस्तित्व संपवू पाहतो.
राजन – जर सुख मनात आहे तर माणूस बाहेरच्या वस्तु मागे का असतो?
रामा- कारण तो स्वतःवर प्रेम करतो, माणूस ज्याची पण अपेक्षा ठेवतो मग ते संपती असो की वैभव, बायको ,मूल हे सगळं उपकरण आहेत. त्यांची अपेक्षा माणूस स्वतःच्या सुखासाठी करत असतो. माणूस आपल्या प्रिय नाती आणि प्रिय माणसाला ही सोडून देतो जर ते दुखाचे मूळ बणत असतील. म्हणून माणूस सर्वात जास्त स्वतःवर प्रेम करत असतो.
कोणताही माणूस स्वतःचा प्रपंच जोडत असेल किवा तो सोडून जात असेल ते त्याच्या स्वतः साठीच आहे. स्वतःसाठी च इतक प्रेम च आत्माच्या सुखस्वरूपचा प्रमाण आहे. आपण या आशेवरती प्रपंच आणि वस्तूंच्या मागे धावत असतो की ते आपल्याला सुख देतील, हे अगदी तसच आहे की जो सुखाचा स्वामी आहे, राजा आहे तरी तो स्वतःला भिकारी समजून दुसर्यांकडून सुखाची अपेक्षा करत राहतो.
हीच आहे अज्ञानाची शक्ति, म्हणून राजन नात्यांच आणि वस्तूंच सुख स्थिर नसत. पण आत्माचा आनंद स्थिर आणि अनंत आहे.
राजन- स्थिर आनंद कसा असतो?
रामा- जेव्हा पण आपण कोणत्या प्रिय व्यक्ति किवा प्रिय वस्तूंना बघतो तर त्यातून आनंद होतो, या आनंदाला शास्त्रप्रिय बोलतात, जेव्हा आपण ती गोष्ट मिळवतो तेव्हा तो आनंद दुपटीने वाढतो, त्याला मोद म्हणतात. आणि जेव्हा आपण त्या वस्तूंचा उपभोग घेतो तेव्हा मिळणार्या आनंदाला प्रमोद बोलतात. आणि जेव्हा आपण त्या वस्तु किवा व्यक्ति पासून दूर होतो तेव्हा आनंद संपून जातो. म्हणून राजे वस्तूंचा आनंद, नात्यांचा आनंद स्थिर नसतो. पण आत्माचा आनंद स्थिर आणि अनंत असतो.
(रामा आणि राजामध्ये सुखावरती खूप संवाद झाला, त्याला वेदामद्धे आनंद मीमांसा बोलतात, सात्विक आनंद, तामसीक आनंद पासून वेगवेगळ्या वस्तूं आणि वेळा मध्ये रामाने मीमांसा केली. पण शेवटी राजन ने तो प्रश्न केला तो यावेळेला सगळ्यांच्या मनात आहे.)
राजन – मालिक जर मीच आत्मा आहे, आणि आत्माचा सुख शरीर, मन, बुद्धी, बाहेरील वस्तु पेक्षा स्वतंत्र आहे तर मी अनंत, असीम आनंदाचा अनुभव का नाही घेऊ शकत?
रामा- राजन जर तू तुझे डोळे बंद केलेस तर अंधारच दिसणार. जोपर्यंत तू शरीर,मन,बुद्धी, प्रपंच, वस्तु यांच्या विचाराने जगणार असशील तर तो अनंत, असीम, पूर्णचा आनंद नाही समजणार. यात चुकी आत्माची नाही आपल्या दृष्टिकोणाची आहे.म्हणून राजे सुख आहे तर ते आत बाहेर नाही.
( सुखाची ईछा च आत्माच्या आनंदस्वरूपाच कारण आहे, म्हणून तर आपण पूर्ण आयुष्य सुखाचा शोध घेत राहतो, आपण जे आहोत त्याचाच शोध घेत राहतो, आपण सुख आहोत म्हणून अनंत सुखाची अपेक्षा ठेवत असतो. या सत्याला न समजणच दुखाच मूळ आहे )
आटपाट नगरात राजन आणि रामा मध्ये झालेली चर्चा खूप काही समजावून जाते, आपणच सुख आहोत मग आपण सुखाचा शोध का घेत राहायच. तस पण संत रामदासांनी सांगितलेलं आहे,
||जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधुनी पाहे||
||जय जय रघुवीर समर्थ ||