कोवळं पान पिकलं ग बाई,
कोवळं पान पिकलं,
भेगा मध्ये अंकुराला श्वास घेता न येई,
मातीच्या घट्ट मिठी मध्ये गुदमरून जाई,
झाडांच्या वेलींवरती त्याला टांगला ग कुणी,,
कोवळं पान पिकलं ग बाई मला सांगल का कुणी।।
सूर्याचे किरण त्याचे काया जाळून गेलं
पानांच्या वेशिवरतून त्याला ढकलून दिलं
उन्हाच्या सावली मध्ये त्याला सडवल ग कुणी।
कोवळं पान पिकलं ग बाई मला सांगल का कुणी।।
लक्ष्य न जाई सूर्या कडे, फिरतोय अन्नासाठी,
कळवळून मूर्खासारखा मागतोय बघा पाणी,
स्वतःच्याच हिरवेपणाची आठवण दिली कुणी,,
कोवळं पान पिकलं ग बाई मला सांगल का कुणी